म्हसावद l प्रतिनिधी
आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात महिला पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या कार्याची, मेहनतीची पावती म्हणजे शाबासकीची पावती. त्यासाठी अशा कर्तृत्ववान व सेवाव्रती महिलांचा आनंद वाढावा म्हणून पण सन्मित्र क्रीडा मंडळ शहादा शहरातील निवडक महिलांचा यथोचित सत्कार 8 मार्चला महिला दिनी करणार आहेत.
कोरोनाच्या महामारीचे काळात देखील या सेवाव्रती महिलांनी आपली सेवा चालू ठेवून समाज सेवा केली व आपल्या कुटुंबाला हातभार लावून आणि कुटुंबातील व्यक्तींना सर्व प्रकारचे सहकार्य केले. अशा कर्तृत्ववान व सेवाव्रती महिलांचा सत्कार जयश्रीबेन दिपक पाटील. (जि.प.सदस्या). भावना भरत शर्मा (आदर्श शिक्षिका), साधना छोटूलाल पाटील (सामाजिक कार्यकर्त्या), भावना प्रमोद चौधरी (सामाजिक कार्यकर्त्या),श्रद्धा विनोद चौधरी (सामाजिक कार्यकर्त्या) या मान्यवरांच्या हस्ते सत्कार आमंत्रितांच्या उपस्थितीत होणार आहे. दि. 8 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजेला कृषक भवन, स्टेट बँकच्या शेजारी शहादा येथे
या सत्कार सोहळ्यास आयोजन करण्यात आले आहे.महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे करण्यात आले आहे.








