नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील लाईट बाजार या गजबजलेल्या व जुन्या भागातील सर्वात जुनी बदुडा चक्की शॉटसर्कीटने मुले लागलेल्या आगीत बेचिराख झाली.यात लाखोंचे नुकसान झाले.या घटनेत नवापूर पालिकेचे निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नवापुर शहरातील लाईट बाजार व्होरा मेडिकल समोरील अब्दुला हमीद बदुडा यांच्या मालकीचे दुकानाला रात्री १ वाजता अचानक शॉटसर्कीटने आग लागली. यात चक्की व तेल गाळण्याचे मशिन सह इतर सामान आगीत खाक झाला आहे.यात लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.आग इतकी भिषण होती की संपुर्ण दुकान आगीत जळुन खाक झाला.आगीचा लोळ दुरपर्यत दिसत होते.
यावेळी गुजराथ राज्यातील सोनगड,व्यारा,नवापूर या भागातुन अग्रिशमन दलाला पाचारण करण्यात आले होते.मात्र नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन बंब उशिरा आल्याने शहरातील नागरीकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.गुजराथ राज्यातुन ४८ कि मी अंतरावर असलेल्या व्यारा नगरपालिकेतुन अग्रिशाम बंब येऊ शकतो तर नवापूर नगरपालिकेचा अग्निशमन बंबला का उशिर झाला असे नागरीकांन मध्ये चर्चेचा विषय होता.
नवापूर शहरात मागील काही दिवसावर विजय इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग लागली होती या घटने नंतर नवापुर नगरपालिकेचे निष्फळ कारभार,निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा लोकांसमोर उघडकीस आला.








