प्रकाशा | वार्ताहर
प्रकाशा येथे भाजपाच्या युवा वॉंरीअर्स अभिनायानाचे फलक अनावरण माजी ऊर्जा मंत्री तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांचा हस्ते करण्यात आले.
या वेळी भा.ज.पा.युवामोर्चो चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील तसेच राजेंद्र गावित, जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील,सरपंच सुदाम ठाकरे हरीभाई दत्तू पाटील ईश्वर पाटील शेलटी ,दिलीप पाटील ,रफिक खाटीक, फारुख खाटीक ,वसंत चौधरी, अंबालाल कोळी , अरुण भिल सुरेश पूना पाटील पं.स.सदस्य,जि.प.सद्स्य ग्रा.पं सदस्य, व भा.ज.पा च्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, पक्षाचे सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते,भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या युवा वारीयर्स अभियान अंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात आला, अभियानात राज्यातील सर्व युवा युवतीचे संघटन करण्याचे उद्दिष्ट साधले जाईल,तरुणांचे नोकरीचे प्रश्न सोडवले जातील,शेतकरी यांचे ही समस्या ची दखल घेतली जाईल, प्रकाशा येथील या कार्यक्रमास युवा मोर्चा चे यात मोठे योगदान राहीले,आहे असे रामचंद्र पाटील,यांनी संबोधित केले. प्रकाशा तील युवा मोर्चा तील युवाकार्यकर्ते अक्षय भावसार,पंकज कोळी,राजेंद्र साळी, महेंद्र साळी, अनिल गुरव,विक्की कोळी,विनोद ठाकरे,सिद्धार्थ सोनार,हिमांशू तांबोळी, दर्शन सोनार, राहुल शिंदे, अविनाश शिरसाठ,भूषण मराठे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम केले. सूत्रसंचालन निखिल चौधरी यांनी केले.सर्व आलेले मान्यवरांनी केदारेश्वर महादेवाचे दर्शन घेतले. प्रकाशा पोलीस बंदोबस्त तैनात होता,जमादार सुनील पाडवी,पोलीस वळवी, शिरसाठ गावित, आलिम मण्यार होमगार्ड,आदी कार्यरत होतेे.