नंदुरबार | प्रतिनिधी-
धुळे- सुरत राष्ट्रीय माहमार्गावर चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग फज्ञटकलगत दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने घडलेल्या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेलया माहितीनुसार, चिंचपाडाहून विसरवाडीकडे जाणारी दुचाकी (क्र.एम.एच.३९-ए.जी.७८५०) रेल्वे क्रॉसिंग फाटक पुढे निघाली असता समोरून सुरतकडे जाणारी दुचाकीं (क्र.जी.जे.०५-एस.एन.०४०७) समोरासमोर धडक होवून अपघात घडला. अपघातात चिंचपाडाहून विसरवाडीकडे जाणार्या नारायण मोतीराम नाईक विलास हिरालाल वसावे, आनंदा इंदुलाल वसावे तिघे रा.चिंचपाडा ता.नवापूर तर समोरील दुचाकीवरील नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील सुरतकडे जाणारा तरूण हरिश्चंद्र देविदास शेवाळे या चौघांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताच्या ठिकाणाहून १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला संपर्क साधून पाचारण करण्यात आला आहे. यावेळी रूग्णवाहिका दाखल झाली. अपघातात गंभीर जखमींना विसरवाडी ग्रामीण रूग्णालयात रूग्णवाहिका डॉ.हेमंत सोनार व पायलट सुभाष गावीत यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरीकांच्या मदतीने दाखल करण्यात आले. अपघातात आष्टे येथील तरूण हरश्चंद्र देविदास शेवाळे यांच्यासह चिंचपाडा येथील नारायण मोतीराम नाईक, विलास हिरालाल वसावे तिघे गंभीर जखमी झाल्याने प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले.