नंदुरबार l प्रतिनिधी
गणपती दूध पितो, देवाच्या डोळ्यांमधून पाणी येते अशा घटना बऱ्याचदा ऐकण्यास मिळतात.यामागे भाविकांची श्रध्दा असते तर बऱ्याचदा अनेकांकडून हि अंधश्रध्दा असल्याचेही बोलले जाते.काल सकाळपासूनच नंदी पाणी पित असल्याची चर्चा जिल्हाभर पसरली आणि शिवालयांमध्ये दर्शनासाठी एकच गर्दी झाली.मंदीरांमध्ये महिला भाविकांच्या रांगा लागल्या. प्रत्येकाने नंदी महाराजांना दूध, पाणी पाजले.मात्र अंनिसने नंदी पाणी पित नसून यामागे पृष्ठीण ताणामुळे अशी घटना घडत असल्याचे स्पष्टीकरण केले आहे.
दुपारची वेळ होती,अचानक भ्रमणध्वनी खणखणू लागले.प्रत्येकाकडून एकच विचारणा,तुमच्याकडे पण नंदी महाराज दूध पिताय का? सोशल मिडीयावरदेखील तीच चर्चाग़ावोगावचे व्हीडीओ व्हायरल झाले आणि मग काही तासांमध्येच सर्व महादेव मंदीरांमध्ये गर्दी झाली.महिला भगिनी नंदी महाराजांना पाणी आणि दूध पाजत होत्याग़र्दी झाल्याने काही ठिकाणी मंदीरांमध्ये भाविकांच्या चक्क रांगा लागल्या होत्या. प्रत्येकाकडून हा एक दैवी चमत्कार असल्याचे बोलले जात होते.जो-तो आपापल्या परीने तर्कवितर्क लावत होता.काही जणांकडून श्रध्दा तर काही जणांकडून अंधश्रध्दा असल्याचे सांगण्यात आले.आमच्या ‘पब्लिक मिरर’च्या प्रस्तुत प्रतिनिधींनी मात्र नेमके यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला.महाराष्ट राज्य अंनिसचे सरचिटणीस विनायक सावळे म्हणाले, कोणत्याही मंदीरात नंदी पाणी पित नाही.यामागे शास्त्रीय कारण आहे.पृष्ठीय ताणामुळे अशा घटना घडतात.हा कोणताही चमत्कार नाही.काही ठिकाणी मूर्तीचा खडा निघाला निखळला असेल तर पोकळ भागातून थेट पाणी पोटात जात असल्याचे दिसत.े यामुळे या घटनेला शास्त्रीय आधार असल्याचे सांगितले.
आज सध्या सर्व लोकांमध्ये एकच चर्चा ऐकायला मिळत आहे, ती म्हणजे महादेवाचा नंदी पाणी पीत आहे. असा सर्वत्र चर्चेचा विषय ऐकण्यात येत आहे. परंतु हे खरे नाही. कारण प्रत्येक वस्तूला, दगडाच्या मूर्तीला एक पुष्टीय ताण असतो. त्या पृष्ठीयताणा मुळेच, त्याला इंग्रजीत सरफेस टेन्शन असे म्हणतात. आणि त्यामुळेच त्या वस्तूच्या, दगडाच्या मूर्तीला जर आपण द्रव्यपदार्थ लावला तर पृष्टीय ताणा मुळे तो द्रवपदार्थ ओढला जातो. तर आपल्याला असे वाटते की ती वस्तू किंवा ती मूर्ती पाणी पिते, दूध पिते. हे शास्त्रीय कारण त्याच्या मागे आहेत. मागे पण गणपती दूध पितो असे खूप ऐकावयास आले होते. पण त्या मागचे शास्त्रीय कारण कळाल्यावर लोकांनी असे करणे बंद केले. कृपया हे खरे शास्त्रीय कारण आहे.
प्रा. ज्ञानी कुलकर्णी
श्रध्दा असो की अंधश्रध्दा काल दिवसभर महादेव मंदीरांमध्ये या घटनेमुळे एकच गर्दी झाली होती व दिवसभर त्याच चर्चा सर्वत्र सुरू होत्या.एवढे मात्र खरे!








