Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात. पेपरला अर्धा तास अधिक वेळ मिळणार

team by team
March 4, 2022
in शैक्षणिक
0
जिल्ह्यात आजपासून बारावीच्या परीक्षांना सुरुवात. पेपरला अर्धा तास अधिक वेळ मिळणार

नंदूरबार l प्रतिनिधी
गेली दोन वर्ष दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांसाठी कोरोणा संसर्गजन्य रोग अडथळा ठरला होता, परंतु यंदा कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा जाहीर झाल्या आहे. ४ मार्च पासून बारावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात होत असून शिक्षण विभाग परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज असल्याची माहिती जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी एम. व्ही. कदम यांनी दिली आहे. यंदाच्या बोर्ड परीक्षेचे विशेष म्हणजे 70 ते 100 गुण असलेल्या पेपरला अर्धा तास जास्त वेळ मिळणार आहे तसेच 40 ते 60 मार्कच्या पेपरला पंधरा मिनिटं अधिकचे मिळणार आहे.

4 मार्च पासून सुरु होणाऱ्या बारावी परीक्षांसाठी एकूण नंदुरबार जिल्ह्यात 114 परीक्षा उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. म्हणजेच शाळांवरच यंदा परीक्षेची सोय करण्यात आली आहे. २०२१-२२ वर्षासाठी 16 हजार 739 विद्यार्थी बारावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहे.
तर 15 मार्च पासून सुरु होणाऱ्या दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 376 शाळा उपकेंद्र म्हणून निर्मिती करण्यात आली. २०२१-२२ वर्षासाठी 20 हजार 703 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षासाठी प्रविष्ट झाले आहे.
दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी बोर्डातर्फे आढावा घेऊन परीक्षेसाठी आवश्यक सूचना देण्यात आलेल्या आहे, तसेच जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.
विशेष म्हणजे यंदाच्या दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेतच देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षांना मुकावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील तणाव दूर करण्यासाठी स्वतःच्या शाळेतच कोणताही दबाव व झडती न घेता परीक्षां देण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अशी माहिती नंदुरबार जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आंदोलनाला यश : सुसरी धरण वळण रस्त्यावर शेतकऱ्यांचा रस्ता दुरूस्तीसाठी केला चक्का जाम, संबंधित विभागाकडून दखल रस्ता दुरूस्तीला सुरुवात

Next Post

यंदा उष्ण लहरी सारखी परिस्थिती, मार्च ते मे महिन्यात असे राहील तापमान

Next Post
यंदा उष्ण लहरी सारखी परिस्थिती, मार्च ते मे महिन्यात असे राहील तापमान

यंदा उष्ण लहरी सारखी परिस्थिती, मार्च ते मे महिन्यात असे राहील तापमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add