Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डायट संस्थेच्या प्रलंबित वेतन बाबत खासदार डॉ.हिना गावीत यांना निवेदन

Mahesh Patil by Mahesh Patil
March 3, 2022
in Uncategorized
0
डायट संस्थेच्या प्रलंबित वेतन बाबत खासदार डॉ.हिना गावीत यांना निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर यांच्या शिष्टमंडळाने खा. डॉ. हिना गावीत व आमदार विजयकुमार गावीत नंदुरबार विधानसभा यांना निवेदन देण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ( डायट ) मधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन नियमित होण्यासाठी उपोषणाबाबत राज्यातील सर्व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था ( डायट ) मध्ये कार्यरत राज्य शासनाद्वारे नियुक्त नियमित अधिकारी व कर्मचारी असूनही आमचे वेतन मागील २ वर्षापासून अनियमित होत आहे. संचालक , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य, पुणे, अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री महोदय या सर्वांना वारंवार निवेदन देवून व प्रत्यक्ष भेटून वेतनाच्या संदर्भात वस्तूस्थिती विषद करण्यात आलेली आहे परंतु अद्यापही तोडगा निघालेला नाही. वेतनाचा प्रश्न अजूनही दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करीत आहे . सद्यस्थितीत मागील ४ महिन्यापासून वेतन प्रलंबित आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जगणे अतिशय अवघड झालेले आहे. शालेय शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी सात्यत्याने काम करणाऱ्या या शासकीय संस्थेकडे शासनाचेच दुर्लक्ष होत आहे. अश्या स्थितीत आमच्या समोर उपोषणास बसण्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणून दिनांक २ मार्च २०२२ पासून आयुक्त शिक्षण पुणे या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचे आम्ही निश्चित केलेले आहे . महाराष्ट्रातील एकूण ३४ जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डायट ) तसेच विद्या प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी टप्प्य टप्प्याने साखळी उपोषणास बसणार आहोत तरी आपणास विनंती आहे की , आमच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न व सहकार्य करावे.याकरिता जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट) चे प्राचार्य डॉ. जगराम भटकर, जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.रमेश चौधरी, डॉ.वनमाला पवार, डॉ.राजेंद्र महाजन,संदीप मुळे, पंढरीनाथ जाधव, अनिल सोनवणे, प्रविण चव्हाण, गिरीश गावीत आदी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

चक्क पोलिस बंदोबस्तात घरकुल लाभार्थ्यांचे होत आहे सर्वेक्षण

Next Post

सावऱ्यादिगर 10 वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाचा अखेर मिळाला मुहूर्त

Next Post
सावऱ्यादिगर 10 वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाचा अखेर मिळाला मुहूर्त

सावऱ्यादिगर 10 वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाचा अखेर मिळाला मुहूर्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

आज होणार 639 ग्रामपंचायतींमधील महिला सरपंच पदाचे आरक्षण सोडत

July 1, 2025
नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group