नंदुरबार l प्रतिनिधी
आरोग्य आणि स्वच्छता यांचा एकमेकांशी संबंध आहे. ग्रामस्थांनी शौचालयांचा नियमित वापर करावा व वैयक्तिक व परिसर स्वच्छता ठेवल्यास गावात शाश्वत स्वच्छता राहील यासाठी ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार शिरीषकुमार नाईक यांनी शितलपाडा ता. नंदुरबार येथे केले .
शितलपाडा (नवागाव) येथे शाश्वत स्वच्छता अभियाना अंतर्गत आयोजित शाश्वत स्वच्छतेचा ग्राम महोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात आ . नाईक ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना बोलत होते . जिल्हा परिषद, पंचायत समिती व फिनीश सोसायटी यांचे मार्फत गावात शाश्वत स्वच्छतेसाठी सुरु असलेले जाणीवजागृती चे उपक्रम स्तुत्य आहेत. ग्रामस्थांनीही त्याला प्रतिसाद देऊन शाश्वत स्वच्छता ठेवावी.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी जिल्हा परिषद , नंदुरबार , एन. एस. ई . फाऊंडेशन व फिनीश सोसायटी या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, गट विकास अधिकारी महेश वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुक्यात विविध उपक्रम सुरु आहेत . त्या अनुषंगाने शितलपाडा (नवागाव) येथे निगराणी समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून गाव शाश्वत उघड्यावरील हागणदारी मुक्त करण्यासाठी रात्री चौपाल, सी एल टी एस , महिला सभा, मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण, युवक सभा, मॉर्निंग फॉलोअप, मशाल रॅली, वॉश संदर्भातील विविध जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबातील नादुरुस्त शौचालयाची दुरुस्ती केली तसेच नवीन शौचालय बांधून त्याचा वापर सुरू केला आहे. तसेच ज्यांच्या कुटुंबाकडे शौचालय नाही असे कुटुंब सार्वजनिक शौचालयाचा वापर करत आहेत.
कार्यक्रमास नवापूर मतदार संघाचे आमदार शिरीषकुमार नाईक व सहाय्यक गट विकास अधिकारी, श्रीमती सुवर्णा पवार विस्तार अधिकारी, भैय्यासाहेब निकुंभे यांच्या हस्ते निगराणी सदस्यांनी शाश्वत स्वच्छतेसाठी परिश्रम घेणाऱ्या निगराणी समितीच्या सदस्याचा सन्मानपञ देऊन गौरविण्यात आले. यावेळी गावातील युवतींनी रांगोळीच्या साहाय्याने पाणी ,स्वच्छता , आरोग्य, पर्यावरण संदेश देण्याचा प्रयत्न केला तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर निगरानी समितीला पुढील काळात गावामध्ये मासिक पाळी व्यवस्थापन, सांडपाणी आणि घन कचरा व्यवस्थापना संदर्भात कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामसेविका संध्या वळवी, माजी सरपंच शर्मिला भोये, माजी उपसरपंच श्रीमती अल्का भोये, बागुल, विजय गावीत, पंडित बागुल, शिक्षक विठ्ठल जरे, अंकित मिश्रा, निगराणी समिती सदस्या गंगुबाई बागूल, सुनीता चौधरी, सुरेखा बागुल, बाली बागुल, आशा बागुल, कलमताई चौरे, मकडीबाई बागुल, वैशाली चौरे,सुशीला बागुल,तसेच गावातील इतर महिला, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता , बचत गटातील महिला, विद्यार्थी युवक, युवती, आदी,ग्रामस्थ फिनीश सोसायटीचे बी.सी.सी. अधिकारी निलेश जाधव , प्रकल्प सहाय्यक नितिन महानुभाव ,राकेश गुरव, विजय गावित, सुनीता भोये,सचिन साळुंखे, संदीप चौधरी , शशिकांत चौधरी,आदी उपस्थित होते.








