नंदुरबार l प्रतिनिधी
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता.अलिबाग जि.रायगड आयोजित पदश्री डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ.श्री.सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनातुन महाराष्ट्र भुषण डॉ.ती.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीवर्षा निमित्त नंदुरबार शहरात जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून एकलव्य विद्यालय येथे १०२ श्रीसदस्यांनी व कृषी उत्पन्न बाजार समिती शहादा येथे ६३ श्री सदस्यांनी असे एकूण जिल्ह्यात १६५ श्रीसदस्यांनी रक्तदान स्वयंस्फूर्तीने करण्यात आले.
नंदुरबार येथे कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश पुजन व दिपप्रज्वलन जिल्हा रुग्णालयाच्या डॉ.रमा मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शहादा येथे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल सखाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करत व अतिशय शिस्तबद्धतेने कार्यक्रम आयोजित करण्यात आला.प्रतिष्ठान च्या माध्यमातून जिल्ह्यात वृक्ष लागवड व संवर्धन, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, बोअरवेल जलपुनर्भरण यासारख्या उल्लेखनीय व स्तुत्य उपक्रम राबवुन जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळत आहे.ह्या शिबीरास जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सातपुते सर, ब्लड बँकच्या डॉ.रमा मॅडम व त्यांचे कर्मचारी तसेच शहादा येथे कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील व प्रतिष्ठानचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.








