म्हसावद l प्रतिनिधी
राज्यस्तरीय राज्य पुरस्कार चाचणी शिबिर २४ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत हस्ती भवन दोंडाईचा जि.धुळे येथे झाले. त्यात नंदुरबार व धुळे जिल्ह्यातून ११९ गाईड सहभागी झाल्या होत्या. या शिबिरात स्काऊट गाईड अभ्यासक्रमावर आधारित लेखी, तोंडी व प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षा घेण्यात आली. यशस्वी होणाऱ्या गाईड विद्यार्थिनींना राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील सहभागी शाळा कमला नेहरू कन्या विद्यालय, डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल, राजे शिवाजी मा. विद्यालय, श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूल, एस. ए. मिशन इंग्लिश मि. स्कूल, पी. के.पाटील माध्यमिक विद्यालय नंदुरबार, तळोदा तालुक्यातील शाळा प्रा. भाईसाहेब गो. हु. महाजन न्यू. हायस्कूल, शहादा तालुक्यातील शारदा कन्या विद्यालय तसेच धुळे जिल्हातील सहभागी शाळा कृषी माध्यमिक विद्यालय ,देवकर माध्यमिक विद्यालय, श्री.पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय, नूतन माध्यमिक विद्यालय, जी.आर.पाटील माध्यमिक विद्यालय इ. शाळांमधून गाइडस् सहभागी झाल्या होत्या. असे दोन्ही जिल्हे मिळून एकूण १५ शाळा सहभागी होते. या शिबिरात शिबीर प्रमुख म्हणून आदरणीय सौ.माया साठे, जिल्हा संघटक आयुक्त गाईड मा. सौ. कविता वाघ तसेच शिबिर सहाय्यक पुनम नेरकर, आशा पाडवी ,छाया पाटील, महाले मॅडम, ज्योती निकवाडे, सिमा पाटील यांनी परीक्षण केले.








