तळोदा l प्रतिनिधी
ब्रिटिशांच्या गोळीबारात तालुक्यातील रावलापानी येथे शहीद झालेल्या आदिवासी शहिदांना श्रद्धांजली वाहून हजारो आदिवासी बांधवांनी त्यांचा स्मृती जागविल्या.त्यासाठी या बांधवांनी न्युबन पासून तब्बल पाच किलोमीटर सातपुड्यातील दऱ्याखोऱ्यं पार केल्या होत्या.

भारतीय स्वातंत्र्यासाठी तालुक्यातील रावलापाणी येथे २ मार्च १९४३ ला संत रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी बांधवांनी तीव्र लढा पुकारला होता.आदिवासींच्या या स्वातंत्र्याचा लढ्यास चिरडून टाकण्यासाठी ब्रिटिशांनी गोळीबार केला होता.त्यांचा गोळीबारात बहुसंख्य आंदोलक शहीद झाले होते.आदिवासी शहिदांच्या स्वातंत्र्य संग्रामाचा हा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी व्हावा म्हणून गेल्या अनेक वर्षापासून मोरवड येथील आप समाजा तर्फे २ मार्च रोजी तेथे श्रध्दाजली वाहण्याचां कार्यक्रम आयोजित केला जातो.बुधवारी देखील हा कार्यक्रम रावलापानी येथील स्मारकस्थली श्रध्दांजलीचां कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.साहजिकच जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी हजेरी लावत शहिदांच्या स्मृती जागवल्या.त्यासाठी हे आदिवासी बांधवाणी न्यूबन पासून तब्बल पाच किलो मिटर सातपुड्यातील दऱ्याखोऱ्या तुडवल्या होत्या.या श्रध्दांजली कार्यक्रमात डॉ.कांतीलाल टाटीया,माजी सभापती जितेंद्र पाडवी,हिरामण पाडवी, किसन महाराज यांनी उपस्थितांना या शहिदांच्या इतिहास सांगितला.यावेळी पंचायत समितीचे सभापती यशवंत ठाकरे,माजी सरपंच नारायण ठाकरे, प्रेमराज पाडवी,परेश पाडवी,अशोक पाटील आदींसह महिला,पुरुष, जिल्ह्यातील संघाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.दरम्यान सदर शहीद स्मारकाचे काम निधी अभावी गेल्या दोन वर्षंपासून रखडले आहे.त्यासाठी जि.प. सदस्य जितेंद्र पाडवी हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.परंतु अजूनही दाद मिळत नसल्याने शासनाच्या अशा उदासीन धोरणाबाबत उपस्थित आदिवासींनी तीव्र नाराजी व्यक्त करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
स्मारकाच्या रखडलेल्या कामा बाबत उपस्थितांनी केली तीव्र नाराजी.शहीद झालेल्या या विरांच स्मारक रावळापानी येथे उभारण्यात येत आहे.तथापि हे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे.आता पर्यंत केवळ ४० लाख रुपये देण्यात आले आहे.तेवढ्याच रकमेचे काम झाले आहे.उर्वरीत निधीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.परंतु उदासीन प्रशासन अजूनही दाद देत नाही.वास्तविक गेल्या वर्षी तत्कालीन जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी स्वतः कार्यक्रमास हजेरी लावून हे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची ताकीद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती.त्यांनीही काम अटोपण्याची हमी दिली होती.मात्र त्यानंतर निधीच उपलब्ध करून देण्यात न आल्यामुळे हे काम तसेच पडून आहे.








