नंदुरबार l प्रतिनिधी
महाशिवरात्री आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्ताने प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालया माउंट आबू( राजस्थान) नंदुरबार शाखेतर्फे रक्तदान शिबिर झाले. या रक्तदान शिबिरात साधकांना सर्व भाविकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी सहभाग नोंदविला.
शहरातील गुरुनानक मंगल कार्यालयात झालेल्या रक्तदान शिबिरात ब्रह्मकुमारी वर्षा सोनी, बीके विजय बडगुजर, सुनील बोरसे तसेच उर्वशी हरियाणी, अनिता मगरे, रमेश बजाज, कमलेश चौधरी, गोविंदा सुनील, प्रेमकुमार मुलचंदानी, हरीश जग्यासी, विजय मंदाना, सुनील माळी आदींनी रक्तदान केले. कार्यक्रमाचे संयोजन केंद्रप्रमुख विजया दीदी आणि बीके योगिता दीदी, नंदुरबार जिल्हा मीडिया समन्वयक महादू हिरणवाळे, तसेच ओम शांती परिवार यांनी केले. रक्तदान शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्राचे जनसंपर्क अधिकारी मनोहर चव्हाण, डॉ. सारिका खताडे, जय सोनवणे, राजेन्द्र मोरे, चालक शरद पाडवी यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिराससह संयोजकातर्फे रोगनिदान तपासणी शिबिर देखील घेण्यात आले. जिल्हा रुग्णालयातर्फे रक्तदान शिबिरात सहभागी दात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. महाशिवरात्री निमित्त आयोजित बारा ज्योतिर्लिंग देखाव्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांनी सपत्नीक भेट दिली.








