नवापुर l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक गावात आई याहा मोगी मातेची लहान- मोठी मंदिरे आहेत. अशातच नवापुर तालुक्यातील वडखुट ( चिंचपाडा ) येथे आई याहा मोगी मातेचे नवीन मंदिर बनविण्यात आले आहे, या मंदिरासाठी आई याहा मोगी मातेची मूर्ती नंदुरबार जि.प.सदस्य तथा माजी अध्यक्ष भरत गावित यांच्याकडून देण्यात आली आहे.
आई याहा मोगी मातेची पंचधातूची मूर्ती नवापुर शहरातील प्रसिद्ध कारागीर तेजेंद्र वाघ यांच्याकडे बनवून भरत गावित यांच्या हस्ते विधीवत पूजन करून ग्रामस्थांना सुपृद करण्यात आली. महाशिवरात्रीच्या पावन पर्वा वर नवापुर तालुक्यातील वडखुट ( चिंचपाडा ) येथे ग्रामस्थांचा वतीने दि.२ मार्च २०२२ रोजी आई याहा मोगी मातेची शोभायात्रा , प्राणप्रतिष्ठा, स्थापना , महाआरती, महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
भरत गावित यांच्या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले तसेच पंचधातूची मूर्ती बनवणारे नवापुर शहरातील एकमेव कारागीर तेजेंद्र वाघ यांची कलाकृती पाहून ग्रामस्थांनी त्यांचे देखील आभार मानले.








