नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बिलीपाडा येथे दारु पिण्यासाठी पैसे न देणाऱ्या पत्नीचा गळा आवळून जीवेठार करणाऱ्या पतीविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची घटना घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील बिलीपाडा येथे पंकज गागू गावित याने दारु पिण्यासाठी पत्नी गायत्री गावित यांच्याकडून पैसे मागितले.मात्र गायत्री हिने पैसे देण्यास नकार दिला.याचा राग आल्याने पंकज गावित याने रागाच्याभरात पत्नी गायत्री गावित यांचा गळा आवळून खून केला.पत्नीचा गळा आवळल्यानंतर तो घटना स्थळावरुन पसार झाल्याचे ईमाबाई वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याबाबत संशयित पंकज गावित याच्याविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२,३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करत आहेत.








