नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा झाली असून 40 व्यक्तींना राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईन लावण्यात आलेली आहे,उर्वरित व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार तालुक्यातील राकसवाडे गावात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित भंडार्याच्या प्रसादमुळे 135 व्यक्तींना विषबाधा झाली असून 40 व्यक्तींना राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाईन लावण्यात आलेली आहे,उर्वरित व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.रुग्णांच्या संख्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान या ठिकाणी वैद्यकीय पथक उपस्थित असून जिल्हा आरोग्य अधिकारी तेथे पोहचले असून उपचार सुरू आहे.राकसवाडे येथे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक गावात असून परिस्थिती आता नियंत्रणात आली असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी जाफर तडवी, राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विंचूरकर व त्यांचे सहकारी यांनी देखील मेहनत घेतली.अशा वेळी रुग्णांचे समुपदेशन करणे या वेळी फार महत्वाचे असते.








