नंदुरबार | प्रतिनिधी
रशिया व युक्रेनमध्ये गेल्या सहा दिवसांपासुन युध्द सुरू आहे.त्यात आज रोजी जेवन घेण्यासाठी गेलेल्या कर्नाटकातील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान अशा भितीदायक वातावरणात नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील शाहिद बागवान दिवसातुन दोनदा तीन किमीचा प्रवास करीत भारतीय विद्यार्थ्यांसाठी जेवन बनवुन खाऊ घालत आहे.अशा वातावरणातही त्याने दाखवलेल्या माणुकीचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

युक्रेन येथे नंदुरबार जिल्ह्यातील एकूण नऊ विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असून पैकी नवापूर येथील सरदार चौक मध्ये राहणारा कशिश जग्निश शहा हा दोन दिवसांपुर्वी सुखरुप घरी परतला आहे. नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील शाहिद रफिक बागवान हा युवक युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी मिकोलाईव्ह येथील पेट्रो मोहल्या ब्लॅक सी या विद्यापीठात एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकत आहे. तो तिथे सुखरूप असून, शाहिदशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तसेच व्हॉट्सअप वरून सतत दोन तासात संपर्क सुरू आहे. तो तिथे सुखरूप असल्याचे शाहिदचे वडील रफीक बागवान यांनी सांगितले.रफिक बागवान हे विसरवाडी येथिल रहिवाशी असुन त्यांचा जिल्ह्यात केळीचा खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. शाहिद बागवान चे दहावी पर्यंत चे शिक्षण तालुक्यातील चिंचपाडा येथे एमानुएल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तर बारावी (विज्ञान) औरंगाबाद येथुन उत्तीर्ण झाल्यानंतर एमबीबीएस ला युक्रेन येथे प्रवेश घेतला. सध्या तो तृतीय वर्षात शिकत आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने गेल्या सहा दिवसांपासुन घमासार युध्द सुरू आहे.खार्किवमध्ये जेवण घ्यायला गेलेल्या कर्नाटक राज्यातील नविन कुमार याला जिव गमवावा लागला असल्याची घटना ताजी असतांना नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील शाहिद रफिक बागवान हा विद्यार्थ्यांची माणुसकीची अनोखी झलक पाहायला मिळाली आहे.रशिया व युक्रेन यांच्या युध्दाचे ढग जमा होत असतांना शाहिद बागवान याने भारतात परतण्याचा विचार करून विमानाचे २८ एप्रिलचे टिकीट बुक करीत असतांना ऐरवी २४ ते ३० हजार असनारे भाडे ७५ हजारावर गेल्याने भारतात येण्याचे शाहिद स्थगीत केले.त्याने त्याला लागणारे अन्नधान्य भरून ठेवले अचानक रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने तो तीथे अडकुन पडला यावेळी शाहिद ने मित्रांच्या मदतीने आजुबाजुच्या परिसरातुन भातरतीय विद्यार्थ्यांना हॉस्टेल मध्ये एकत्र केले.तेथील बाकीच्या विद्यार्थ्यांकडे जेवणासाठीचे साहित्य होते.मात्र त्यातील १२ ते १५ विद्यार्थ्यांकडे जेवणासाठी सोय नसल्याने शाहिद बागवान हा हॉस्टेल पासुन तीन कि.मी अंतरावर असलेल्या त्याच्या रूमवरून दोन तीन जणांना सोबत घेऊन स्वयंपाक तयार करून खाऊ घालत आहे.सुरवातील रूमपर्यंत जाण्यासाठी आता भाडे ही महागले आहेत. अशा युध्दाच्या स्थीतीत ही भारतीय विद्यार्थ्यांसाठी आपला जीव धोक्यात घालुन शाहिद जेवण खाऊ घालीत आहे.याबाबत त्याचा अभिमानच आहे.असे त्याचे वडील रफीक बागवान यांनी सांगितले.दरम्यान रूमानीयामार्ग येण्यासाठी हे विद्यार्थी बसच्या प्रतिक्षेत आहेत. विसरवाडीतील बागवान कुटुंब चिंताग्रस्त झाले आहे. आपल्या मुलाला घरी परत आणण्यासाठी देशाकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला जात आहे. मात्र, आपल्या काळजाचा तुकडा परदेशात युध्द परिस्थितीत अडकला आहे. आईवडील म्हणून त्यांची चिंता आहेच. त्यामुळे तो कधी घरी येईल, अशी आम्ही आतुरतेने पाहात आहोत. असे शाहिद चे वडील रफीक बागवान यांनी सांगितले.
जो डर गया समजो मर गया
नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील शाहिद बागवान हा युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी मिकोलाईव्ह येथील पेट्रो मोहल्या ब्लॅक सी या विद्यापीठात एमबीबीएसच्या तृतीय वर्षात शिकत आहे. रशिया व युक्रेन यांच्यात युध्दाला सुरूवात झाल्यानंतर त्याचा पालकांशी संपर्क झाला.यावेळी तो घाबरलेल्या अवस्थेत होता.त्यावेळी त्याचे वडील रफीक बागवान यांनी सांगितले कि, अशा युध्दाच्या प्रसंगी तुझ्याजवळ काही पर्याय आहेत का,त्यावेळी शाहिद बागवान यांनी काही पर्याय नसल्याचे सांगीतले.त्यावेळी वडील रफीक बागवान यांनी शाहिदला शोले चित्रपटाचा प्रसिध्द डायलॉग जो डर गया समजो मर गया याची आठवण करून देत धिर देत मनोधेर्य वाढवले.








