नंदुरबार l प्रतिनिधी
उत्तरकार्याचा कार्यक्रम आटोपून तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथून लक्कडकोटकडे परतत असतांना म्हसावद-तोरणमाळ रस्त्याने दुचाकीने जात असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरोने धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण ठार तर बालकासह तिघे जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील हेमराज नकला मोरे(वय ३५) हे पत्नी पेमलाबाई मोरे, मुलगा शौर्य मोरे व सासू ओमनीबाई रंजन पावरा यांच्यासह तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे उत्तरकार्याचा विधी आटोपून लक्कडकोट येथे दुचाकीने(क्र.एमपी ४६ एमके५७८५)परतत होते.म्हसावद-तोरणमाळ रस्त्यावर समोरुन येणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाने (क्र.एमएच ४६ बीएफ ९४०४) रामपूर आश्रमकडे जात असतांना इस्लामपूर गावाजवळ दुचाकीला धडक दिली.घडलेल्या अपघातात दुचाकीवरील हेमराज मोरे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर पेमलाबाई मोरे, ओमनीबाई पावरा व शौर्य मोरे हे जखमी झाले आहेत.याबाबत अंबालाल नकला मोरे यांच्या फिर्यादीवरुन बोलेरो चालकाविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४(अ),२७९,३३७,३३८,४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण करत आहेत.








