म्हसावद l प्रतिनिधी
महाराष्ट्रचे क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथील भगवान गोरक्षनाथ महाराज यात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून आज यात्रेचे ध्वज पूजन विधिवत करण्यात आले.
तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांचा यात्रोत्सव दि.1 मार्च रोजी सुरुवात झाली असून महाशिवरात्री निमित्ताने मंदिराची रंगरंगोटी व मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली.तसेच मंदिरावर ध्वज पूजन करून तोरणमाळ परिसरातील नर्मदा तलाव,नागार्जुन मंदिर,मच्छिंद्रनाथ गुफा,तोरणादेवी मंदिर,तोरणेश्वर महादेव मंदिर,जालंदरनाथ मंदिर,सीतामाई, कुलफा बाबा,महादेव पिंड,गोगापीर उर्फ गोरख्या नाईक या ग्राम दैवतांचे पूजन करून सर्वत्र भगवे ध्वज लावण्यात आले. महाशिवरात्रीस भरणाऱ्या यात्रोत्सवानिमित्त भगवान गोरक्षनाथांच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.








