नंदुरबार l प्रतिनिधी
महाशिवरात्रि आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू (राजस्थान) संचलित नंदुरबार शाखेतर्फे भव्य बारा ज्योतिर्लिंग देखावा उभारण्यात आला आहे.
शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयतर्फे महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग देखाव्याची उद्घाटन सोमवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होईल. सिंधी कॉलनी परिसरातील गुरूनानक मंगल कार्यालय सभागृहात दिनांक 28 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत दररोज सकाळी 7 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा भाविकांना पाहण्यासाठी खुला राहणार आहे. तसेच बुधवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या साधकातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराससह विविध रोग निदान तपासणी देखील करण्यात येणार आहे. परमपिता परमात्मा शिव यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी बारा ज्योतिर्लिंग देखावा पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि ओम शांती परिवारातर्फे करण्यात आले आहे.








