तळोदा l प्रतिनिधी
शहरातील वर्दळीच्या गल्लीतून कामासाठी बाजारात जात असताना बडोदा बँक जवळील मंदिरा जवळुन जात असताना मोटरबाईक अंगावर आणत महिलेच्या गळ्यातील मंगलपोत झटका देऊन पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथील ठाणेदार गल्ली येथील रहिवासी राजाराम रामदास चौधरी यांची पत्नी मंगला राजाराम चौधरी व पुतणी सारिका राहुल चौधरी हे बाजारात जात शहरातील बडोदा बँक जवळील मंदिरा जवळुन जात असताना मागाहून येणाऱ्या मोटरसायकल साराने गळ्यातील 40 हजार रुपये किमतीची दिड तोळयाची मंगल पोत धूम स्टाईल नाही ओरडून घेऊन मोठा माळीवाडा कडे पसार झाला या झटापटीत सदर महिला खाली पडल्याने अज्ञात चोरट्यांनी पळण्याची संधी मिळाली. सदर मोटर सायकल स्वार मोठ्या मारुती मंदिराकडून येऊन बडोदा बँक येथे चालत असलेली महिला च्या गळ्यातील मनी मंगळसूत्र पोत ओरबडून ताणून घेऊन गेले याबाबत मंगला राजाराम चौधरी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भाद वी कलम 393, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथे रात्री उशिरापर्यंत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद याचे काम सुरू होते.








