Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उद्यापासून रंगणार नाटकांचा बोलबाला जिभाऊ करंडक एकांकिका स्पर्धेचे २६ फेब्रुवारी उद्घाटन, दोन दिवसात १५ बहारदार एकांकिकांचे सादरीकरण

team by team
February 25, 2022
in राज्य
0
उद्यापासून रंगणार नाटकांचा बोलबाला जिभाऊ करंडक एकांकिका स्पर्धेचे २६ फेब्रुवारी उद्घाटन, दोन दिवसात १५ बहारदार एकांकिकांचे सादरीकरण

नंदुरबार l प्रतिनिधी
गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे तर्फे नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरात जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा सुरु होत आहेत. यात राज्यभरातून १५ नाट्यसंस्थांनी सहभागी घेतला आहे.
नंदुरबार येथे दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान कालकथित जयदेव निंबा पेंढारकर अर्थात जिभाऊ यांच्या स्मरणार्थ सदर स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातून पुणे, बोईसर, बदलापूर, कल्याण, भुसावळ, किल्लेधारुर (बीड), चोपडा, नाशिक, नंदुरबार व मध्यप्रदेश येथून इंदौर येथील नाट्यसंस्था सहभागी होणार असून १५ एकांकिकांची नोंदणी झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन दि.२६ फेब्रुवारी रोजी दुपारी ११ वाजता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सुधीर तांबे, धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी नोकरांची सहकारी बँकेचे गटनेते निशांत रंधे, नंदुरबार जिल्हा अकादमीचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत तर मान्यवर म्हणून ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, नगरसेवक दीपक दिघे, युवा उद्योगपती नितेश अग्रवाल, नरेश नानकाणी, शितलकुमार पटेल, प्राचार्य डॉ.संजय शिंदे, जे.एम.पाटील, भिमसिंग वळवी, पत्रकार रणजीत राजपूत, किरण तडवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण दि.२७ फेब्रुवारी २०२२ रविवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री ना.ॲड.के.सी.पाडवी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, माजीमंत्री पद्माकर वळवी, सिने दिग्दर्शक श्याम रंजनकर तर मान्यवरात प्रा.डॉ.शिवानंद सुर्यवंशी, मिलिंद पहूरकर, निलेश तंवर, जय हिंदडा माता ट्रा.ए.सोसायटीचे अध्यक्ष सुकदेव गावीत, अहिर सुवर्णकार समाजाचे सचिव पुरुषोत्तम विसपुते, लायन्स क्लबचे डॉ.पंकज पटेल, कृषी अधिकारी विजय मोहिते, रोटरी क्लब ऑफ नंदुरबारचे अध्यक्ष निरज देशपांडे यांची उपस्थिती राहणार आहे. या दोन दिवशीय एकांकिका स्पर्धेचे परिक्षण महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम कुणाल मिश्रा, नाट्यअभिनेता दिग्दर्शक तथा सहाय्यक प्राध्यापक थिएटर्स आर्टस विभाग मुंबई विद्यापीठाचे डॉ.प्रदीप सरवदे, अभिनेत्री, दिग्दर्शिका तथा वेशभुषाकार स्नेहाकुमार हे मान्यवर करणार आहेत.
जिभाऊ करंडक आयोजन समितीतर्फे दरवर्षी दिला जाणारा मानाचा दिपस्तंभ हा पुरस्कार यंदा साहित्यीक तथा पत्रकार रमाकांत पाटील यांना देण्यात येणार आहे. स्पर्धेदरम्यान प्रसिद्ध हास्य कलाकार विलासकुमार शिरसाठ यांची तुफान स्टॅण्डअप कॉमेडीचा कार्यक्रम दि.२७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वाजता होणार आहे.
या दोन दिवसात सादर होणार्‍या एकांकिका पुढील प्रमाणे. दि. २६ फेब्रुवारी २०२२ वार शनिवार दु.१२ ते १ अजुनहि चांद रात आहे….(म.गांधी महाविद्यालय, चोपडा), दु.१ ते २ मडवॉक (यथार्थ क्लब, नंदुरबार), दु.२.३० ते ३.३० नेकेड ऍण्ड अफ्रेड (विजिकिषा नाट्य अकादमी, नाशिक), दु.३.३० ते ४.३० घर आपलंच आहे…. (माया एंटरटेनमेंट , नाशिक), दु.४.३० ते ५.३० म्याडम (म.गांधी महाविद्यालय, चोपडा), सायं. ६ ते ७ डॉक्टर फॉर बेगर्स (भाव फुलांचा पारिजात, नंदुरबार) सायं. ७ ते ८ मुंग्या (नाहटा महाविद्यालय, भुसावळ), रात्री ८ ते ९ कस्तुरी (वुमन्स डेव्हलपमेंट ऍण्ड रिसर्च सेंटर, किल्लेधारुर, बीड), दि.२७ फेब्रुवारी २०२२ वार रविवार रोजी स.९ ते १० छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे..? (सनी कलामंच किल्लेधारुर, बीड), स १० ते ११ रांगणार्‍या माणसाचे रहस्य (सर्वमान्य, इंदौर), स.११ ते १२ खारुदादाचा ड्रामॅट्रीक विकेन्ड (नवरस कलाकरंग सांस्कृतिक अकादमी, बोईसर) दु.१२ ते १ कन्सल्टंट (नादश्री नाट्यकर्मी, पुणे), दु.१.३० ते २.३० मुक्तीधाम (रंगायन, इंदौर), दु.२.३० ते ३.३० संजीवनी (सावित्री-रंभा कलामंच संस्था, बदलापूर), दु.३.३० ते ४.३० जीर्णोद्धार (अभिनय, कल्याण).
सदर एकांकिका पाहण्यासाठी कुठलेही प्रवेश फी नसून सर्वांना विनामुल्य पाहता येणार आहे, तरी जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह तुषार ठाकरे, राहुल खेडकर, तुषार सांगोरे, कुणाल वसईकर, सागर कदम, किरण दाभाडे, जितेंद्र खवळे, रवींद्र कुलकर्णी, सुनील चौधरी, मराठा सेवा संघाचे राजेंद्र पाटील आदींनी केले आहे. स्पर्धे दरम्यान सर्वांकडून कोरोना-१९ नियमांचे कोटेकोरपणे पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार आगारातून धुळे, नाशिक, जळगावसाठी एसटी बस सुरू

Next Post

एसटीचा संप मिटविण्याबाबत नंदुरबार प्रवासी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Next Post
नंदुरबार आगारातून धुळे, नाशिक, जळगावसाठी एसटी बस सुरू

एसटीचा संप मिटविण्याबाबत नंदुरबार प्रवासी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add