तळोदा l प्रतिनिधी
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून झालेल्या अटकेच्या निषेधार्थ तळोद्यात राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातील स्मारक चौकात हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी, नगरसेवक संजय माळी, युवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, रा.कॉ.पा तालुकाध्यक्ष डॉ.पुंडलिक राजपुत, राष्ट्रवादी शहराध्यक्ष योगेश मराठे, काँग्रेस शहर अध्यक्ष गौरव वाणी, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, भास्कर मराठे, कृ.उ.बा समितीचे संचालक भरत चौधरी, प्रल्हाद फोके, युवा नेते संदिप परदेशी, केसरसिंग क्षत्रिय, माजी नगरसेवक सत्यवान पाडवी, मुस्लिम समाज अध्यक्ष शेख आरिफ नूरा, साबिर बागवान, कमलेश पाडवी, नितीन पाडवी, राहुल पाडवी, शहर उपाध्यक्ष गणेश पाडवी, नदीम बागवान, गणेश राणे, अनिल पवार, मुस्ताक अली कालुमिया, रफिक शेख, फिरोज बेलदार, याकूब पिंजारी, साबीर शेख, गग्गू पिंजारी, गोटू मन्सूरी, आदिल शेख, महेंद्र गाढे, धर्मराज पवार,महेंद्र पोटे, दीपक वळवी, नदीम शेख, नदीम कुरेशी, अशपाक शेख, दिनेश वळवी, कुशन वळवी, हरिदास वळवी, प्रकाश पाडवी, मुकेश पाडवी, हरीष खरड़े, योगेश खरड़े, योगेश पाडवी,
नितिन मराठे, डॉ.गणेश पाटिल , अरविंद पाडवी, आदींसह काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.








