नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातुन चोरीस गेलेले २२ लॅपटॉप व ११० मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबर पोलिसदलाला यश आले असून, नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते शहर पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मोबाईल व लॅपटॉप मूळ मालकांना परत देण्यात आले. तब्बल १४ लाखांचा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी परत केला.
नंदुरबार जिल्हाभरात गेल्या काही दिवसांत मोबाईल हरविणे किंवा चोरीस जाण्याचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे पोलिसांपुढे चोरट्यांना शोधणे आणि मोबाईल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान होते. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेला याबाबत सूचना देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले होते. एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी मध्य प्रदेश, गुजरातसह राज्यातील विविध भागातून हरविलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल जप्त केले. तब्बल ११ लाख ४६ हजार ९४८ रुपये रुपये किमतीचे ११० मोबाईल जप्त करण्यात आले होते. जप्त करण्यात आलेले मोबाईल नंबर शोधून ते मूळ मालकांना परत देण्यात आले. याशिवाय नवापूर तालुक्यातील पानबारा येथील शासकीय आश्रमशाळेतील लॅपटॉप २२ चोरट्यांनी चोरून नेले होते. त्याबाबत विसरवाडी पोलिसांनी तपासाचे कौशल्य वापरून गुन्हा उघडकीस होते. आणला. एकूण दोन लाख ६४ हजार रुपये किमतीचे लॅपटॉप हस्तगत करण्यात आले व ते शाळा मुख्याध्यापक पी. पी. वसावे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.पोलीस दलाच्या कामगिरीचे उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी कौतुक केले. कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर अधीक्षक विजय पवार, उपअधीक्षक विश्वास वळवी, आत्माराम प्रधान, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, श्रीकांत घुमरे, संभाजी सावंत यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.








