शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बोराळे ता.शहादा येथील जि. प. शाळेत अवंतीका फाऊंडेशन शहादातर्फे वत्कृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या विजेत्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
जि. प.शाळा मातकुट व बोराळे यांच्या संयुक्त विद्यमाने जि. प. शाळा बोराळे येथे अवंतिका फाउंडेशन तर्फ विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला सरपंच अविनाश सोनवणे तसेच अवंतीका फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्षा पल्लवी प्रकाशकर ,संस्थेचे संघटक रामचंद्र नाईक , छायाताई प्रकाशकर,शा.व्य.समिती सदस्य विजू सोनावणे,माजी शा.व्य.समिती अध्यक्ष ग्रामसेवक श्री.ठाकरे जि.प.शाळा बोराळे येथील मनोहर भामरे , प्रताप पाडवी, जि. प. शाळा मातकुट येथील रामदास जाधव, श्रीमती अर्चना सोनार , श्रीमती लक्ष्मी पवार , दोन्ही शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमात निबंध स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा व्यक्तिमत्व विकास या स्पर्धेमध्ये प्रथम तनुजा सुतार व अविनाश पवार , द्वितीय योगिता कोळी व काजल भील आणि तृतीय काजल गोरख भील व चंदा भील या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र,स्केचपेन बॉक्स, पेन इत्यादी असे शालेय साहित्य. देऊन गौरविण्यात आले .तसेच वयैक्तिक स्वच्छता स्पर्धेत यज्ञा पाटिल ,काजल भील व पायल भील या विद्यार्थ्यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
या कार्यक्रमात अवंतीका फाऊंडेशनच्या वतीने बोराळे -मातकुट ग्रायपंचायतीला कोविड -19काळात केलेल्या उत्तम कामगिरी साठी विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मातकुट शाळेचे मुख्याध्यापक रामदास यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार बोराळे शाळेचे मुख्याध्यापक मनोहर भामरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.शाळेत वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन शपथ घेऊन समारोप करण्यात आला.








