नंदुरबार | प्रतिनिधी
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग दिल्ली अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण (एलिम्को) यांच्यामार्फत सामाजिक अधिकारीता शिबीरात नंदुरबार तालुक्यातील २१६ दिव्यांग लाभार्थ्यांना खा.डॉ.हीना गावित यांच्या हस्ते निशुल्क सहाय्यक उपकरण वाटप करण्यात आले.
सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग दिल्ली अंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण (एलिम्को) यांच्यामार्फत सामाजिक अधिकारीता शिबीर येथील श्रॉफ हायस्कुलमध्ये घेण्यात आले. यावेळी खा.डॉ.हीना गावित यांच्या हस्ते दिव्यांगांना उपकरण वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.डॉ. विजयकुमार गावित होते. कार्यक्रमाला पं.स.सभापती प्रकाश गावित, समाजकल्याण अधिकारी श्री.नांदगावकर डॉ.सुप्रिया गावित, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष राजेश चौधरी, सविता जयस्वाल, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. यावेळी २१६ दिव्यांगांना विविध उपकरणांचे वाटप करण्यात आले. यात ट्रायसायकल, मोटरयुक्त सायकल, व्हीलेचअर, श्रवणयंत्र, चालण्याची काठी, मिसेड किट, सीपी चेअर, चष्मा, टेट्रापॉड, ट्रायपॉड, वॉकर आदी उपकरणांचा समावेश होता.