Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसतर्फे निषेध

team by team
February 24, 2022
in राजकीय
0
मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रवादी शहर युवक काँग्रेसतर्फे निषेध

नंदुरबार l प्रतिनिधी
भाजप शासीत केंद्रीय सरकारच्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या केंद्रीय यंत्रणेला हाताशी धरुन महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्र्यांची बदनामी करुन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना चुकीच्या पध्दतीने अटक केली आहे. या अटकेचा राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेस पार्टीतर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे, तसे निवेदन राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष लल्ला मराठे यांनी जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांना दिले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवानेते ॲड.राऊ दिलीपराव मोरे यांच्या सुचनेनुसार नंदुरबार शहर युवक कॉंग्रेस पार्टीतर्फे नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. निवेदनात पुढे म्हटले आहे की, भाजप शासीत केंद्रीय सरकार कडुन अंमलबजवणी संचालनालय या केंद्रीय यंत्रणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांची सुडबुध्दीने व व्देषापोटी टार्गेट केले जात आहे. नवाब मलिक राज्याचे सन्माननीय मंत्री असुन त्यांच्यावर चुकीच्या पध्दतीने कार्यवाही करुन अटक केली आहे. अंमलबजावणी संचालनलायमध्ये काम करणारे अधिकारी यांना कायद्याचे भान नाही का? मंत्र्याना किंवा कोणालाही अटक करावयाची असेल तर कायदेशिर नोटीस दिली जाते, नंतर चौकशी करायची असते, याची पुर्तता न करता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. सदरची अटक ही बेकायदेशिररित्या असुन केंद्रात असलेले भाजप सरकारने ठरवुन केलेले आहे. सदर ही बाब राज्यातील व देशातील लोकशाहीला घातक असुन केंद्रीय भाजप सरकार तानाशाही, हुकूमशाही राबवत असुन केंद्रीय यंत्रणेचा वापर करुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारातील मंत्र्यांना सुडबुध्दीने बदनाम करण्यासाठी त्यांच्यावर कार्यवाही करित आहे. देशात अनेक मोठ-मोठे उद्योगपती आपली संपत्ती चुकीच्या पध्दतीने कमवुन ठेवतात याचा तपास ईडी का करित नाही, नवाब मलिक साहेब हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आहेत म्हणुन त्यांना अटक करण्यात आली का? हा देखील प्रश्न निर्माण होतो. तरी आम्ही आपणास विनंती पुर्वक निवेदन सादर करितो की, केंद्रीय शासीत भाजप सरकार देशातील लोकशाही संपवु पहात आहे हे सुडबुध्दीचे व व्देषाचे राजकारण आहे त्याचा आम्ही निषेध करित आहोत, असे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतेप्रसंगी यावेळी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष लल्ला मराठे, राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार तालुकाध्यक्ष सुरेश वळवी, शहर उपाध्यक्ष लाला बागवान, राजा ठाकरे, साजिद बागवान, दिनेश भिल, अरुण पाडवी, संजय कोळी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पोलीस पाटीलांचा रिक्त जागा भराव्यात नागेश पाडवी यांची मागणी

Next Post

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने

Next Post
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add