Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अंगणवाडी सेविकेचा मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस धडगाव न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा

team by team
February 23, 2022
in क्राईम
0
महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

धडगाव येथील अंगणवाडी सेविकेचा मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस धडगाव न्यायालयाने १ वर्ष ७ महिने सश्रम कारावास व रुपये ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १५ ते १६ जुलै २०२० दरम्यान सकाळी ७ वाजेपर्यंत फिर्यादी केसरीबाई नथ्थु परमार हया धडगाव , कृष्णा नगर येथील रहीवासी असुन अंगणवाडी सेविकेचे कामकाज करतात . फिर्यादी यांना अंगणवाडीचे कामकाजाकरीता आय.डी.सी.एस. कार्यालय , धडगाव यांचेकडुन पॅनॉसोनिक कंपनीचा मोबाईल मिळाला होता . सदर मोबाईल हा कार्यालयीन उपयोगासाठी असल्याने फिर्यादी हया नेहमी त्यांच्याजवळ ठेवत होत्या . सुरवाणी येथे मिटींग करुन दुपारी ४ वा . धडगाव येथील त्यांच्या राहत्या घरी येवुन घरातील पुढील कामे आटोपुन रात्री १० वाजेच्या सुमारास झोपण्यापुर्वी त्यांनी त्यांचा मोबाईल बॅगमध्ये ठेवून सदर बॅग घरातील रॅकवर ठेवली होती . फिर्यादी यांनी त्यांचे दैनंदिन कामकाजकरीत असतांना सकाळी १० वाजता त्यांची सुरत येथे राहणारी मुलगी रेखा हिचा मिसकॉल लहान मुलगी बबिता हिचे मोबाईलवर आला होता म्हणुन तिला फोन करण्यासाठी ऑफीसचा मोबाईल घेण्यासाठी रॅकवर ठेवलेली बॅग उघडली असता त्यात मोबाईल मिळुन आला नाही . मोबाईल मुलगी बबिता हिच्याकडे असले म्हणुन तिला विचारले असता तिच्याकडे मोबाईल नसल्याचे तिने फिर्यादीस सांगितले होते . त्यानंतर फिर्यादी केसरीबाई यांनी घराचे आजुबाजुला असणारे रहीवासी यांना देखील विचारपुस केली असता त्यांनी देखील मोबाईल बाबत माहिती नसल्याचे सांगितले होते . मोबाईल घरातच कुठेतरी अनावधाने ठेवला गेला असेल म्हणुन फिर्यादी केसरीबाई यांनी पुन्हा त्यांच्या घरात मोबाईलची शोधाशोध केली परंतु मोबाईल मिळुन आलेला नाही . तेव्हा केसरीबाई यांना लक्षात आले की , कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे संमतीशिवाय स्वतःच्या फायदयासाठी लबाडीच्या इरादयाने सदरचा मोबाईल चोरुन नेला आहे . अशी खात्री झाल्याने सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी अंगणवाडी कार्यालयातील सुपरवायझर उषा पाडवी यांना कळविले असता त्यांनी सांगितले की , मोबाईल चोरीला गेल्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दयावी लागेल म्हणुन फिर्यादी केसरीबाई यांचे तक्रारीवरुन धडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयाविरुध्द तक्रार दाखल केली होती . सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पोहेकॉ दिलीप साळवे यांनी केला होता . तपासात मोहसिन ऊर्फ मोहसिन अय्युब बेलदार याने मोबाईल चोरी केल्याचे उघडकीस आले होते . म्हणुन त्याचेविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते . सदर खटल्याची सुनावणी दिपक जी . कंखरे , जे . एम.एफ.सी. न्यायाधीश धडगाव यांच्या कोर्टात होवुन आरोपी मोहसिन ऊर्फ मोहसिन ‘ अय्युब बेलदार यांच्याविरुध्द भा.द.वि.क. ३८० अन्वये गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने सदर आरोपीस १ वर्ष ७ महिने सश्रम कारावास व रुपये ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता ॲड. . बी . आर वळवी यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पो.कॉ. समाधान केंद्रे यांनी कामकाज केले आहे . तपास अधिकारी , सरकारी वकील व पैरवी अधिकारी यांचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

धडगांव येथे महिलेला मारहाण प्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा

Next Post

अखेर मिळाले : नंदुरबार जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी सतिष यु.चौधरी यांची नियुक्ती

Next Post
अखेर मिळाले : नंदुरबार जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी सतिष यु.चौधरी यांची नियुक्ती

अखेर मिळाले : नंदुरबार जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारीपदी सतिष यु.चौधरी यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add