नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील पाणबारीचा पाटीलपाडा येथे नजर लागून महिला आजारी पडते असा संशय घेवून पाच जणांनी महिलेला मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पाच जणांविरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यात पाणबारीचा पाटीलपाडा येथे राहणार्या सरीता धिरसिंग वळवी या महिलेची नजर लागल्याने उतरीबाई वसावे या नेहमी आजारी पडतात. असा संशय घेवून ठोग्या वसावे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून सरीता धिरसिंग वळवी व धिरसिंग कटया वसावे यांना हाताबुक्यांनी मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत धिरसिंग वसावे व सरीता वळवी यांना दुखापत झाली. याप्रकरणी सरीता धिरसिंग वळवी याच्या फिर्यादीवरून ठोग्या बामण्या वसावे, बटेसिंग ठोग्या वसावे, कालुसिंग ठोग्या वसावे, उतरीबाई कालुसिंग वसावे, विलांती कालुसिंग वसावे सर्व रा. पानबारीचा पाटीलपाडा (ता.धडगांव) यांच्या विरूध्द धडगांव पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना स्वप्निल गोसावी करीत आहेत.








