Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मानव विकास मिशनअंतर्गत मातांना बुडीत मजुरी वितरीत करावी : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
February 23, 2022
in सामाजिक
0
राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
मानव विकास कार्यक्रमांतर्गत बुडीत मजुरीपासून वंचित राहिलेल्या प्रसूत मातांना मजुरीचे तातडीने वितरण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गाभा आणि नवसंजीवनी समितीची बैठक जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) विजय शिंदे, सदस्य डॉ. कांतिलाल टाटिया, लतिका राजपूत, संजय महाजन आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, मानव विकास कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्रयरेषेखालील प्रसूत मातांना देण्यात येणाऱ्या बुडीत मजुरीची रक्कम त्वरीत देण्यात यावी. प्राथमिक आरोग्य केन्द्रात प्रसूत मातांना लाभ देण्यासाठी अपेक्षित यादी तयार करुन तालुकास्तरावर सादर करावी. सर्व नोंदणी झालेल्या सर्व मातांना मजुरीचा लाभ द्यावा. नवसंजीवनी बैठकीचा तालुकास्तरावर यंत्रणेने दरमहा आढावा घ्यावा. प्रसूत मातांना देण्यात आलेल्या बुडीत मजूरीच्या रकमेची वर्षनिहाय माहिती सादर करावी.
दुर्गम भागातील बालकांच्या जन्माची नोंद करण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दरमहा बैठकीचे आयोजन करावे. रेशनकार्ड, आधारकार्ड, बँकखाते अद्ययावत करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे. अमृत आहाराचा नियमित पुरवठा करावा. दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी आवश्यक औषधांचा साठा करावा. त्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्यक औषधाच्या पुरवठ्याबाबत तत्काळ मागणी कळवावी. बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार पालिकेची यंदा फक्त 15 टक्के वसुली, शहरातील सर्वात मोठे थकबाकीदार 50 खातेदारांदारांची मालमत्ता होणार जप्त, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी घेतला आढावा

Next Post

धडगांव येथे महिलेला मारहाण प्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा

Next Post
नंदूरबार येथे महिलेसह कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांना अटक, सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

धडगांव येथे महिलेला मारहाण प्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add