नंदूरबार l प्रतिनिधी
पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक बी . जी . शेखर पाटील हे नंदुरबार जिल्हा वार्षिक तपासणी भेटी दरम्यान नवापुर पोलीस ठाणे येथे आले असता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची पत्नी डॉ . विद्युलता शेखर पाटील व नवापुर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रीमती हेमलता पाटील यांचे हस्ते नवापुर पोलीस ठाणे येथे महिला विश्राम गृहाचे उद्घाटन करण्यात आले .
यावेळी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व इतर अधिकारी उपस्थित होते . भारतीय समाज सुरुवातीपासुनच पुरुष प्रधान समाज राहिलेला आहे . स्त्रीला फक्त चुल आणि मुल याच दृष्टीकोनातून बघितले जात होते परंतु आजच्या आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना आपल्याला दिसतात . आजची स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही . अगदी ह्या आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात महिलांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे . आजची स्त्री पुरुषांप्रमाणेच आपल्या कुटूंबाचा आर्थिक भार उचलण्यात सक्षम बनलेली आहे . विवाह झालेली स्त्री सासरसंबंधी आपली कर्तव्य पूर्ण करून तिने निवडलेल्या क्षेत्रात आपली जबाबदारी चोखपण पार पाडत आहे . पालौस दलात महिला पोलीसांचे 30 टक्के आरक्षण असून आता महिला पोलीसांचे प्रमाण बाढलेले आहे . पोलीस दलात पोलीस शिपाई ते अनेक मोठ्या पदांवर महिला आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतांना दिसत आहे . पोलीस दलात पुरुषांप्रमाणेच महिला देखील 24 तास कर्तव्यास बांधील आहेत . त्यामुळे त्यांना कर्तव्य करतांना कुठलीही अडचण येवू नये व कामातून थोडा विसावा मिळावा तसेच स्तनदा महिला अमलदार यांना कर्तव्य करीत असतांना घरी जावून बाळाला स्तनपान करण्यासाठी घरी जाणे शक्य नसते . अशा महिला अमलदारांसाठी पोलीस ठाण्यातच महिला विश्रांती गृह हे सोयीचे होते . त्यामुळे महिला अमंलदारांना पोलीस ठाण्यातच महिला विश्राम गृह निर्माण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून कळविण्यात आले होते जेणेकरुन महिला अमंलदार मुल व नोकरी या दोन्हीकडे सारखे लक्ष देवून आपले कर्तव्य करीत असतात . त्यानुसार काल पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक बी . जी . शेखर पाटील हे नंदुरबार जिल्हा वार्षिक तपासणी भेटी दरम्यान नवापुर पोलीस ठाणे येथे असता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची पत्नी डॉ . विद्युलता शेखर पाटील व नवापुर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा यांचे हस्ते नवापुर पोलीस ठाणे येथे महिला विश्राम गृहाचे उद्घाटन करण्यात आले . सदर प्रसंगी पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक बी. जी . शेखर पाटील यांनी महिला विश्राम गृहात बालकांसाठी खेळणी व उपयोगी साहित्य उपलब्ध करून देण्याचे सूचना दिल्या आहेत व महिलांनी महिला विश्राम गृहाचा उपयोग करून याठिकाणी विसावा करीत असतांना वाचनालयातील पुस्तकांचा वाचनासाठी उपयोग करावे असे सांगितले . सदर कार्यक्रमाच्या वेळी पोलीस उप महानिरीक्षक , नाशिक परिक्षेत्र , नाशिक बी . जी . पाटील शेखर , डॉ . विधुलता शेखर पाटील , पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , नवापुर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रीमती हेमलता पाटील , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , नवापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व नवापुर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व अमलदार उपस्थित होते .








