नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तहसिल कार्यालयाच्या बाहेर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा जणांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आदिवासी टायगर सेनेचे अध्यक्ष रविंद्र पाडवी यांनी धडगांव तहसिल कार्यालयाच्या बाहेर जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी जिल्ह्यात मनाई आदेश लागू केल्यानंतरही आंदोलन करीत जमा जमाव केला म्हणून पोलीस शिपाई रितेश बेलेकर यांच्या फिर्यादीवरून धडगांव पोलीस ठाण्यात आदिवासी टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाडवी रा.वाण्याविहिर (ता.अक्कलकुवा), ठाणसिंग लोटया पावरा, दिलीप राज्या पावरा, राज्या बारता पावरा, रोहिदास शेंडया पावरा, मुकेश कुच्या पावरा, शेगा डेकल्या पावरा, सायकला गणपत पावरा, छगन गुलाबसिंग पावरा, तेरसिंग कालशा पावरा यांच्या विरूध्द भादंवि कलम १८८, २६९,२९०, महा पोलीस अधिनियम २०१२ चे कलम ३७ (१) (१) चे उलघंन क १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना गोसावी करीत आहेत.








