तळोदा l प्रतिनिधी
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री अँड पद्माकर वळवी यांचा संकल्पना मार्गदर्शनाखाली.संजय गांधी निराधार योजनेचा लाभार्थ्याना मंजुरी पत्र घरपोच मिळावे यासाठी ” अध्यक्ष आपल्या दारी ” उपक्रम राबविण्यात येत आहे. तळोदा तालुक्यातील भवर, सोरापाडा, शिर्वे, पाठडी, झिरी, मोदलपाडा, नळगव्हाण, लोभाणी आदी गावात मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
तळोदा संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष “आपल्या दारी “उपक्रम लाभार्थीना योजनांचे मंजुरी पत्र वाटप केले. जि.प अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पाठडी गावात येथे लाभार्थींना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. तळोदा तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्याना घरपोच मंजुरी पत्र वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य निशा पद्माकर वळवी यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत झाले.यावेळी समिती अध्यक्ष प्रविण वळवी व समिती सदस्य धर्मेंद्र वळवी यांच्या हस्ते मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
यावेळी “अध्यक्ष आपल्या दारी ” राबविण्यात आलेल्या उपक्रमामुळे लाभार्थी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.








