नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील उपनगर पोलीस स्टेशन हद्यीत वाघोदा ता.जि. नंदुरबार येथे २ वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस नंदुरबार सत्र न्यायालयाने १० वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
दि. ३१ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ८ वाजेचे सुमारास उपनगर पोलीस स्टेशन हद्यीत वाघोदा ता . जि . नंदुरबार येथे आरोपीच्या घरात घडली होती . फिर्यादी महिला रा . वाघोदा ता . जि . नंदुरबार या पती , सासु – सासरे , दिर व मुले असे कुटुंबासह एकत्र राहतात. दि . ३१ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला यांचे घरातील सर्व सदस्य हे मजुरी कामानिमित्त घराबाहेर गेले होते . तसेच फिर्यादी यांचे सासरे हे गावात फिरण्याकरीता गेले होते . घरात महिला फिर्यादी यांच्यासह त्यांची पिडीत २ वर्षीय पिडीत मुलगी व दोन्ही मुले हजर होते . सकाळी ११ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला यांची पिडीत मुलगी ही आरोपी शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे यांच्या अंगणात खेळत असतांना फिर्यादी ही त्यांच्या राहत्या घराच्या ओटयावर भांडे घासत होती . तेव्हा थोडया वेळाने फियांदी यांना त्यांची पिडीत मुलगी हिचा रडण्याचा आवाज आल्याने फिर्यादी ही धावततपळत आरोपी शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे याचे घरी गेली असता घराचा पुढील दरवाजा उघडा होता व आतल्या खोलीचा दरवाजा आरोपीने आतुन बंद केला होता. म्हणुन फिर्यादीने बंद दरवाज्याजवळ जावुन त्यांच्या मुलीस आवाज दिला असता आरोपी शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे याने त्याचे घराचा दरवाजा उघडुन पिडीत मुलगी हिंस घराचे बाहेर काढले . तेव्हा फिर्यादी यांना आरोपी शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे हा अर्धनग्न अवस्थेत दिसून आला होता . त्यावेळी पिडीत मुलगी हिने तिच्या फिर्यादी आईस आरोपी काल्या यांचेकडे बोट दाखवुन सांगितले की , ” या मामाने मला खेळण्याचे गोटयांचे आमिष दाखवुन घरात बोलावले व अत्याचार केले असे सांगितले होते . तेव्हा फिर्यादी यांनी घाबरून जोरजोराने आरडाओरड केल्याने तेथील रहीवासी फिर्यादी जवळ आले होते . तेव्हा आरोपी शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे याने त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद करुन घेतला होता . फिर्यादी यांनी त्यांचे पतीस फोनव्दारे झालेली घटना कळविली . त्यानंतर फिर्यादी महिला हया त्यांच्या पती व पिडीत मुलीसह उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे याचेविरुध्द तक्रार दयायला आले होते . फिर्यादीच्या तक्रारीवरून वर नमुद घटनेचा गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर , उपनगर पोलीस ठाणे यांनी करुन आरोपीविरुध्द न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्र सादर केले होते . सदर खटल्याची सुनावणी आशुतोष भागवत , अति . जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार यांच्या कोर्टात होवुन आरोपी शिवदास ऊर्फ काल्या भाईदास ठाकरे रा . वाघोदा , ता . जि . नंदुरबार याचे विरुद वा.लै.अ.का.क. ( पोक्सो ) – ४ अन्वये गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने सदर आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास व रुपये ९ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील ॲड . तुषार कापडीया यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ नितीन साबळे व पोना गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे . तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक नंदुरबार पी . आर . पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे .