तळोदा l प्रतीनिधी
तळोदा शहरात सन 2019 मध्ये मंजूर झालेल्या घरकुलाच्या लाभार्थीना उर्वरित रक्कम अद्याप बाकी असून ती लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी व घरकूलच्या उर्वरित रकमेच्या लाभापासून वंचित असणाऱ्यांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी शहर शिवसेनेतर्फे नगरअध्यक्ष अजय परदेशी यांचा कड़े लेखी निवेदन द्वारे केली आहे
निवेदनात म्हटले आहे की, सदर योजनेत आमची नावे ही 2019 ला मंजूर झालेली आहेत.मंजूर घरकुलांचे काही हप्ते हे अगोदर टाकण्यात आली परंतु काही हप्ते हे अद्यापही टाकण्यात आलेली नाहीत. त्यामुळे आम्हा लाभार्थ्यांवर उघड्यावर पडण्याची वेळ सध्याच्या परिस्थिती आलेली आहे. तसेच काही लोकांना घर भाडे देणे सुद्धा मोठ्या अडचणीचे झालेले आहे.मागील जून महिन्यात आम्हाला शेवटचा हप्ता हा मिळालेला होता.त्या नंतर आम्हाला नगरपालिकेचे वारंवार चक्कर मारून व संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून देखील मिळालेले नाही. म्हणून आमच्यावर मोठे संकट आलेले आहे.
जिल्ह्यातील सर्व नगर पालिकेत घरकुलचे हप्ते हे सुरळीतपणे त्या ठिकाणाच्या लाभार्थ्यांना मिळत आहे मग तळोदा नगरपालिका का नाही? नगर पालिकेच्या कर्मचारी यांचा हलगर्जीपणामुळे आज आमच्यावर उघड्यावर राहण्याची व जे पैसे आम्हाला या योजनेचे मिळाले आहे.ते भाडे देण्यात जात आहे.मागील दोन वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांना आधीच कोरोनाची झळ बसली असून हातचा रोजगार हिरावला गेला आहे.हातावर पोट असणाऱ्यांचे पोट भरणेच जिकरीचे जात आहे असून त्यांना घरकुलाचे काम नगरपालिकेकडून पूर्ण रक्कम न मिळाल्यामुळे त्यांना अद्याप भाड्याच्या घरात राहवे लागत आहे.घर पूर्ण करण्यासाठी अनेक लाभार्थीनी पालिकेकडून लवकर उर्वरित रक्कम मिळेल या आशेवर उसनवारी पैसे घेतले आहेत.त्यामुळे त्यांना एकीकडे घरभाडे भरण्याचे ताण असून दुसरीकडे आणि उसनवारी ने घेतलेले पैसे देणे आपणाकडून रक्कम न मिळाल्याने कठीण झाले आहे.अशा परिस्थितीत सर्वसामान्य लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
सदर निवेदनाच्या माध्यमातून आपणांकडे मागणी करण्यात येते की,सन २०१९ मध्ये मंजूर लाभार्थ्यांचे घरकुलची उर्वरित रक्कम आठ दिवसांत जर घरकुलचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावे.दरम्यान,या मागणीकडे आपण गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा तळोदा शहर शिवसेनेतर्फे तीव्र असे आंदोलन छेडण्यात येईल.त्यामुळे याप्रकरणी निर्माण होणाऱ्या सर्व परिणामास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील याची आपण नोंद घ्यावी.असे निवेदनात नमूद आहे
निवेदनवार शहर प्रमुख जितेन्द्र दुबे,नगरसेविका प्रतीक्षा दुबे,अनुप उदासी,आनंद सोनार,श्रावण तिजवीज,जगदीश चौधरी,विजय मराठे,विपुल कुलकर्नी ,विनोद वन्जारी आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.