मोलगी l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरातील लाईटचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून मागील दोन महिन्यांपासून परिसरातील लोक यासमस्येने हैराण झाले आहे . खरीब हंगामातील शेतीचे उत्पन्न अतिवृष्टीमुळे हातचे गेल्यामुळे रब्बीहंगामातील शेतीवर आस लावून असलेल्या शेतकऱ्यांची या हंगामातही निराशाच पदरी पडली आहे .
मोलगी परिसरातील लाईटचा मागील दोन महिन्यातील अस्तिरतेमुळे खरीप हंगामातील शेती संकटात सापडली आहे . काही शेतकऱ्यांची तर शेतातील पिकं पूर्णपणे सुकून गेल्याने परिसरातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे . मोलगी परिसर हा पूर्ण तालुका दर्जाच्या परिसर असून पूर्ण परिसराचा विचार करता अनेक लाखो रुपयांचा नुकसानीचा अनुमान आहे . पण या गंभीर समस्येवर कोणीही सुधारणा सुचवायला तयार नाही . परिसरातील लोकांचे मिटर बिल मात्र रेग्युलर येते आणि शेतकरी वर्ग व परिसरातील नागरिक नियमित भरणाही करतात मात्र त्यांना रेग्युलर लाईट भेटत नाही . २४ तासातून दिवसाला फक्त दोन ते तीनच तास लाईट भेटत असून तीही अगदी डीम असून त्यावर कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू चालत नाही . लाईट पाच मिनिटे थांबल्या वर अर्धा एक तास जाते व पन्हा येते अशी परिस्थिती या परिसरातील आहे . लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्यांवर विचार करणे आवश्यक आहे . मोलगी परिसर हा अशाच अनेक प्रश्नांनी नेहमीच चर्चेत येतो लाईट , बँकेच्या समस्या , नेटवर्कच्या समस्या आरोग्याच्या , रस्त्याच्या समस्या , अशा मोजता न येणाऱ्या समस्या आहे . या प्रश्नावर आंदोलने ही होतात ते झाल्या शिवाय प्रशासन व अधिकारी वर्गाला जागच येत नाही . मोलगी परिसरातील या समस्येवर उपाय म्हणून उभारण्यात येणाऱ्या सुरवाणी येथील १३२ के.वी.विद्युत केंद्राचे कामही मागील अनेक वर्षांनी रखडले असल्याने समस्या मात्र कायम आहे .