म्हसावद l प्रतिनिधी
शहादा शहरात प्रेस मारुती मैदानाचे मोकळ्या जागेत पानटपरीवर उधारीचे पैश्यावरून किरकोळ वाद होऊन युवकावर चाकु हल्ला करण्यात आला असुन याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करून तिघांना पोलीसांनी अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दि.१९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास फिर्यादी गणेश मांगु नेरकर याचा मामे भाऊ देवेंद्र समाधान पाटील यांचे तीन दिवसापूर्वी संशयीत आरोपी आकाश वाडीले यांच्या पानटपरीवरील ऊधारीचे पैशावरून किरकोळ वाद होऊन फिर्यादीचा मामेभाऊ देवेद्र याने आरोपी आकाश वाडीले यास गालावर चापट मारली त्याचे वाईट वाटल्याच्या कारणावरून देवेंद्र समाधान पाटील यास संशयीत आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन हाताबुक्यांनी मारहाण करून लोखंडी धारदार सुर्याने पोटावर डाव्या बाजुस मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.यात देवेंद्र समाधान पाटील वय २२ वर्षे रा दिनदयाल नगर शहादा यांना डाव्या बाजूस पोटावर सुरा मारल्याने सुरवातील श्रेयस हॉस्पीटल मध्ये दाखल त्यांच्यावर उपचार सुरू आहे.याप्रकरणी गणेश मांगु नेरकर रा.गांधी नगर,शहादा यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात आकाश वाडीले ऊर्फ फाक्या पुर्ण नाव माहित नाही. योगेश मराठे , मंगल, निलेश बच्चु पाटील, कुणाल ठाकरे सर्व रा. शहादा यांच्या विरूध्द भादवि क ३०७ , १४३ , १४७ , १४९ , सह भा. ह.का.के. ४ चे उघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी याप्रकरणी योगेश संजय मराठे रा . रामनगर शहादा, तुकाराम बच्चु पाटील रा.सालदार नगर शहादा, आकाश उर्फ फाक्याशंकर वाडीले रा . साईबाब नगर शहादा यांना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पुढील तपास सपोनि संदीप आरक करीत आहेत.








