नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम उपस्थित मुख्याध्यापक सुदाम पाटील यांच्या शुभहस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आढावा आपल्या भाषणातुन सादर केला. शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती व्हावी म्हणून शाळेच्या वतीने चित्रकला रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात प्रामुख्याने तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी शिक्षक भरत पावरा, चंदू पाटील, राजू मोरे, उषा पाटील, गोपाल गावीत आदी उपस्थित होते.विद्यार्थी सहभाग होता.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजू मोरे यांनी केले.उपस्थितांचे आभार चंदु पाटील यांनी मानले.