नंदूरबार l प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नंदूरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अवघ्या पेन व पेन्सीलच्या सहाय्याने अवघ्या २० ते २५ मिनीटांत एका फुटाचे रेखाचित्र रेखाटुन आगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करीत अभिवादन केले.
नंदूरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी चित्रकलेचे कुठलेही प्रशिक्षण घेतलेले नाही.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील संवेदनशील मनाचे अधिकारी असून उत्तम चित्रकार आहेत.आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने नंदूरबारचे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अवघ्या पेन व पेन्सीलच्या सहाय्याने अवघ्या २० ते २५ मिनीटांत एका फुटाचे रेखाचित्र रेखाटुन आगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करीत अभिवादन केले.यापूर्वीही त्यांनी भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लतादिदींचे पेन व पेन्सीलच्या सहाय्याने अवघ्या २० ते २५ मिनीटांत ५ बाय १० से.मि.चे रेखाचित्र रेखाटुन आगळी वेगळी श्रध्दांजली अर्पण केली होती.