तळोदा l प्रतिनिधी
जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने तळोदा नागरिकाच्या सेवेसाठी शववाहिनी भेट देण्यात आली. या शववाहिनीचे लोकार्पण प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या प्रमूख उपस्थित करण्यात आले.
मयत झालेल्या व्यक्तीची शव दवाखान्यातून अथवा अपघातस्थळापासून घरी अथवा नातेवाईकांकडे नेण्यासाठी नातेवाईकांना अथक परिश्रम घ्यावे लागत होते. रुग्णवाहिकेत शव नेण्यासाठी नकार दिला जात होता. परिणामी खाजगी वाहन चालक या बाबीचा गैर फायदा घेऊन अधिक मोबदला आकारत होते. त्यामुळे मरणानंतर देखील यातना सोसाव्या लागत होत्या. या सर्व बाबींचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तळोदा शहरवासीयांसाठी शव वाहिनी प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करून लोकार्पण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा कोषाध्यक्ष निखिल तुरखिया,जिल्हा उपाध्यक्ष डॉ रामराव आघाडे, तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत, शहर अध्यक्ष योगेश मराठे, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, कृ.उ.बा.स. संचालक भरत चौधरी, युवानेते संदीप परदेशीं, राजेश पटेल, शहर उपाध्यक्ष गणेश राणे, गणेश पाडवी,भट्या पाडवी, युवक तालुका अध्यक्ष कमलेश पाडवी संघटक राहुल पाडवी,सहसंघटक नितीन वाघ,नासिर शेख, मु.स.अध्यक्ष आरीफ शेख, मु.स.सचिव याकूब, आदिल शेख, मुस्ताक अली सय्यद रफिक शेख, प्रल्हाद फोके, युवक शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी, हितेश राणे, विकास खाटीक,इमरान सिकलिकर, नितीन मिस्त्री, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या लाडक्या मंत्रीच्या वाढदिवसाचा केक कापून आनंद साजरा करण्यात आला. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या अनोख्या भेटीच्या शहरवासीयांच्या समस्यां सोडविण्यासाठी उपयोग होणार आहे. दुःखद प्रसंगी शव घेऊन जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. मृतदेहाची हेडसांड होऊ नये याकरिता जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शववाहिनी देण्याचा संकल्प तळोदा राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता असे प्रतिपादन उदेसिंग पाडवी यांनी केले. तर आदिवासी जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती जोपासत आदिवासी समाजाची कुलदैवत याहा मोगी मातेची मूर्ती व आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेली सिबली (टोपली) व संघर्षाचे प्रतीक तिरकामठा हे जयंतराव पाटील यांना वाढदिवसा निमित्त देण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.