तळोदा l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगांव तालुक्यातील वनजमिनींचे सीमाकांन करून हद्द निश्चित करण्यात यावी अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी निवेदनात केली आहे.
या बाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलकुवा व धडगांव या आदिवासी बहुल तालुक्यात वर्षानुवर्षापासून शेती हा मुख्य व्यवसाय करून गुजराण करीत आला आहे. विशेष म्हणजे या तालुक्यातील शेतकऱ्यांना आपली शेती आधुनिक पद्धतीने करण्यासाठी शासकीय योजनांचा माध्यमातून विहीर, फळबाग, दगडी बांध, ठिबक सिंचन, सौर ऊर्जा सह विविध योजनांचा लाभ मिळविण्यासाठी धडपड करीत असतात मात्र एरवी कधीं फिरणारे या तालुक्यातील वनअधिकारी, कर्मचारी या शेतकऱ्यांना नाहक त्रास देत असल्याने निष्कर्षाने निदर्शनात येत आहे. तरी धडगांव व अक्कलकुवा तालुक्यातील वनजमिनींचे सीमाकंन मापन करून वनजमिनींचे हद्द निश्चित करून या तालुक्यातील शेतकऱ्यांना वनविभागाकडून नाहक होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे अशी मागणी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांनी निवेदनात केली.