Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुजलॉनने बळकावलेल्या शेतजमिनी शेतकर्‍यांना परत द्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची मागणी, खा.डॉ.हिना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित यांना निवेदन सादर

team by team
February 16, 2022
in राजकीय
0
सुजलॉनने बळकावलेल्या शेतजमिनी शेतकर्‍यांना परत द्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची मागणी, खा.डॉ.हिना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित यांना निवेदन सादर

नंदुरबार l प्रतिनिधी
सुजलॉन कंपनीने बळकावलेल्या नंदुरबार तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांच्या शेतजमिनी परत देवून नुकसान भरपाई दयावी तसेच सुजलॉनने खरेदी केलेल्या जमिनीची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने खा.डॉ.हिना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम.जी.राजपूत व जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील यांनी खा.डॉ.हिना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित यांची निवासस्थानी भेट घेवून निवेदन दिले. सदर निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही नंदुरबार तालुक्यातील शेतकरी असून आमची शेतजमिन सूजलॉनची उपकंपनी मे सर्जन रियलिटीज लि. या कंपनीने फसवणूकीदवारे खरेदीखत साठेखत व कुलमुखत्यारपत्र करुन बळकावली आहे. सदर जमिन आम्ही विकली नसतांना सुजलॉनचे अधिकारी, दलाल,रजिस्ट्रार व तलाठी यांना हाताशी धरुन कंपनीने आमच्या जमिनीवर अवैध नोंद केलेली आहे. सातबारावर खोटी नोंद घेवून आमची फसवणूक करण्यात आली आहे. जमिनी देतांना भाडे कराराने जमिनी घेत आहोत असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही आमची जमिन सुजलॉन कंपनीला वापरवयास दिली. मात्र खोटे दस्तावेज करुन गेल्या 16 वर्षापासून कंपनीने जमिनीवर दादागिरीने ताबा बसविला आहे. सोळा वर्षापासून सुजलॉन कंपनी आमच्या जमिनीचा वापर करीत आहे. या जमिनीवर रस्ते, टॉवर उभारुन कंपनी आर्थिक फायदा घेत आहे. आमची जमिन कंपनीने अभिनेते,बिल्डर,उदयोगपती आदींना करोडो रुपयामध्ये परस्पर विकली आहे.आम्हाला अल्पशा एकरी वीस ते पंचवीस हजार रुपये मोबदला देऊन कंपनीने आमची जमिन बळकावली आहे. तरी सुजलॉन कंपनीने आमची फसवणूक करुन बळकावलेली आमची शेतजमिन आम्हाला परत दयावी. आमच्या जमिनीवरच्या सातबारा उतार्‍यावरील सूजलॉन कंपनीने केलेल्या सर्व नोंदी रद्द करुन शेतजमिन खरेदीची चौकशी दोषींवर गुन्हे दाखल करावे तसेच 16 वर्षापासून सुजलॉन कंपनी विनामोबदला जमिन वापरत आहे. तरी सदर जमिनीची 16 वर्षापासूनची नुकसान भरपाई आम्हांला मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच धुळे उपविभागीय अधिकारी यांनी दि.11/10/2018 रोजी परिपत्रक काढून धुळे उपविभातील शेतजमिनीवरील 7/12 च्या इतर हक्कांतील कुलमुखत्यारपत्र/जनरल मुखत्यारच्या नोंदी रद्द करण्याचा आदेश काढला आहे. या संदर्भात मा.उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई यांचेकडील रिट याचिका क्रमांक 8042/22014 नारायण आत्माराम भोई विरुध्द तहसीलदार ठाणे च्या निकालपत्रात आदेशाचा आशयावरुन महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 148 च्या तरतुदी नुसार महसूल अधिकार अभिलेखात योग्य त्या नोंदी घेणे अपेक्षीत आहे. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने कुलमुखत्यारपत्र किंवा जनरल मुखत्यार याचा तपशिल अधिकार अभिलेखात घेता येणार नाही. त्यामुळे धुळे व साक्री तालुक्यातील सर्व शेतजमिनीच्या 7/12 उतार्‍यावरील अशा प्रकारच्या नोंदी उक्त कायद्यातील तरतूदीनुसार बेकायदेशीररित्या घेण्यात आलेल्या असल्यामुळे रद्द करण्यास पात्र आहेत. त्यामुळे सर्जन रियालिटीजच्या प्रतिनिधी कुलमुखत्यार म्हणून इतर हक्कात घेण्यात आलेल्या नोंदी /शेरा या आदेशाद्वारे कमी की करण्यात येत आहेत, असे उपविभागीय अधिकारी धुळे यांनी परिपत्रकात म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथील श्रेयस कॉलनी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ

Next Post

अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे संत रोहिदास व संत सेवालाल महाराज जयंती साजरी

Next Post
अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे संत रोहिदास व संत सेवालाल महाराज जयंती साजरी

अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे संत रोहिदास व संत सेवालाल महाराज जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add