Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदर्श आश्रमशाळा देवमोगरा मध्ये प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत

team by team
February 16, 2022
in शैक्षणिक
0
आदर्श आश्रमशाळा देवमोगरा मध्ये प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत येणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2022-2023 या शैक्षणिक वर्षांत आदर्श आश्रमशाळा, देवमोगरा ता. नवापूर या निवासी शाळेत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीच्या वर्गात प्रवेशासाठी प्रवेश अर्ज वितरित करण्यात येत आहेत.
प्रवेश अर्ज एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, गट शिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र पंचायत समिती तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील. परीपुर्ण भरलेले प्रवेश अर्ज 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा येथे शिक्षण शाखेत येथे स्विकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
प्रवेश परीक्षेत बसणारे विद्यार्थी, विद्यार्थीनी हे सन 2021-2022 या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीत शासकीय, अनुदानित किंवा जिल्हा परिषद शाळेत शिकणारा असावा. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे बोनाफाईड प्रमाणपत्र, इयत्ता चौथीचे प्रथम सत्र परीक्षा गुणपत्रक, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख पेक्षा अधिक नसावे. सोबत आर्थिक वर्ष 2020-2021 चा उत्पन्नाचा दाखला अर्जा सोबत जोडावा. तरी जास्तीत जास्त पालकांनी प्रवेशाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रांझणी शिवारात दोन बिबट मध्ये झुंज, भीती वातावरण

Next Post

तळोदा येथील श्रेयस कॉलनी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ

Next Post
तळोदा येथील श्रेयस कॉलनी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ

तळोदा येथील श्रेयस कॉलनी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add