तळोदा l प्रतिनिधी
भारतरत्न, भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्व.लता मंगेशकर यांचं दि.६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने कला क्षेत्रावर शोककळा पसरली. लतादीदी यांच्या गाण्याच्या अविस्मरणीय आवाज विसरणे शक्य नसल्याचे संगीत रसिक आणि गायकांना भरून आले. स्व.लता दिदींचा असाज तळोदा येथील एक निस्सीम चाहत्याने आज दि.१५ फेब्रुवारी रोजी निधनाच्या दहाव्या दिवशी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा येथे दशक्रिया विधी पार पाडला,दरम्यान गंध मुक्ती व उत्तर कार्यासह सर्व धार्मिक विधी पार पाडणारा आहे.

स्व.लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अनेक दिवसांच्या उपचारांनंतर त्यांनी करोनावर मातही केली होती. यानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्यात आली होती. मात्र, प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना पुन्हा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अखेर दि.६ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधनाने शोककळा कोसळल्याने अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण केल्या.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखले जाते. त्या भारताच्या हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीच्या सुप्रसिद्ध गायक आणि गायिकांपैकी एक होत्या. बॉलिवूड विश्वामध्ये त्या ‘लता दीदी’ म्हणून ओळखल्या जात होत्या. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात आला होता.भारतरत्न लाखो संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्व. लता मंगेशकर या त्यांच्या अनेक चाहत्यांसाठी दैवत होत्या. अशाच एक संगीतप्रेमी असलेल्या तळोदा येथील एका अवलिया संगीतप्रेमी सतीश कुवर यांनी ग्राम सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रति आदरभाव व्यक्त करत आज दि.१५ रोजी उत्तरकाशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रकाशा येथे दशक्रिया विधी पार पाडला. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार देखिल उपस्थित होते. दरम्यान दि.१८ रोजी तळोदा येथील विमलनगर परिसरात त्यांनी गंधमुक्ती व उत्तर कार्याचे ही नियोजनही केले आहे.तर रात्री लतादीदींच्या विविध गाण्यावर आधारित स्वरांजली या कार्यक्रमातून नंदुरबार, शहादा तसेच बोरद येथील आर्केस्ट्रा कलाकारांकडून गीत रूपाने आदरांजली वाहिली जाणार आहे. या उत्तरकार्य विधीला व स्वरांजली कार्यक्रमाला रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सतीश कुवर यांनी केले आहे. स्व.लता मंगेशकर यांना दैवत मानत आज मुंडण करीत दशक्रिया विधी पार पाडला.त्यांनी या विधीद्वारे स्व.लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली अर्पण केली.








