नंदूरबार l प्रतिनिधी
बंजारा समाजाचे आराध्यदैवत संत शिरोमणी सेवालालजी महाराज यांच्या २८३ व्या जयंतीनिमित्त काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक तांड्यात विविध उपक्रम राबवुन संत सेवालाल महाराजांची जयंती साजरी करण्यात आली . त्याअनुषंगाने आज नंदुरबार येथील कोकणीहिल परिसरात अखिल भारतीय बंजारा क्रांती दल यांच्यातर्फे कोविडच्या परिस्थितीचे नियम पाळत साध्या पद्धतीने संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त भोग लावुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी अखिल भारतीय बंजारा क्रांतीदलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण म्हणाले की , समाज बांधवांनी महाराजांनी दिलेले आध्यात्मिक धडे व बंजारा समाजाची संस्कृती यांचे जतन करून महाराजांचे विचार तांड्यातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचवा . तसेच बंजारा धर्मगुरु संत सेवालाल महाराज हे खुप मोठे विचारवंत व समाजसुधारक होते . त्यांनी साधारणत: २५० वर्षांपूर्वी जी वाणी महाराजांनी बोलून दाखविली होती आपल्या, दुदर्शी वाणीने महाराजांनी जे भाकित केले होते . ते आज तंतोतंत खरे ठरत आहे . रुपिया कटोरो पाणी म्हणजे आज आपण २० रुपये देवून एक कटोरा पाणी घेतो आहे . सोन्याचे सिंग म्हणजे लाखो रुपयांना बैलजोडी भेटत आहे . राजकीय परिस्थितीसुद्धा त्याच टप्यावर येवून थांबलेली आहे . वेगवेगळे दल आणि आघाड्या होतांना आपल्याला दिसत आहे असेही श्री . चव्हाण यांनी सांगितले . यावेळी नायब तहसिलदार रामजी राठोड , आतिष राठोड , अनिल राठोड , विक्रम चव्हाण , दिलीप राठोड , भावेश पवार , युवराज चव्हाण , प्रेम चव्हाण , हंसराज नायक , चैत्राम राठोड , विजय चव्हाण , सुपडू राठोड , चेतन राठोड , प्रताप नायक , केसरसिंग नायक , नरहरी नायक , पवार नायक , ओंकार चव्हाण , सुरेश चव्हाण , रविंद्र चव्हाण , बाबु राठोड , मोरसिंग राठोड , सचिन राठोड , ज्ञानेश्वर राठोड आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मोरसिंग राठोड यांनी केले . तर आभार युवराज चव्हाण यांनी मानले . कार्यक्रम यशस्वितेसाठी भावेश पवार , प्रेम चव्हाण , चैत्राम राठोड आदींनी परिश्रम घेतले .