नंदूरबार l प्रतिनिधी
सुझलॉन टॉवरवर दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असणाऱ्या हट्टी येथील चौघांना नंदुरबार तालुका पोलीसांनी काळमदेव परिसरातून अटक केली दरम्यान एक जण फरार होण्यात याशस्वी झाला.त्यांच्या कडून एक एअर गन, तलवारसह साहित्य जप्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार तालुका पोलीस स्टेशन हद्दीत सुझलॉन कंपनीतर्फे २५० पवन चक्की बसवण्यात आलेल्या आहेत . सदर यांमधील केवल वायरच्या चोरीच्या वारंवार पडत होत्या . सदर चोऱ्या धुळे जिल्ह्यातील हट्टी खु. ता . साक्री गावातील टोळीकडून करण्यात येत होत्या व सदरची टोळी ही सुझलॉन कंपनीचे टॉवरसाठी नेमलेल्या सुरक्षा रक्षकांना धाक दाखवून त्यामधील केबल चायरची चोरी करणार आहेत.अशी माहिती मिळाली होती . पोलीस अधिक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , अपर पोलीस अधिक्षक विजय पवार . उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे दि . १४ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास नंदुरबार तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी वेगवेगळे पथक तयार करुन काळमदेव मंदिराच्या पायथ्याशी दबा धरून बसले . गुप्तबातमीनुसार एका मोटार सायकलवर चार इसम व एका मोटार सायकलवर एक असे काळमदेव मंदिराच्या पायथ्याजवळ आले असता त्यांना पोलीस पथकांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले . यात संदिप गोरख सुर्यवंशी, मनोहर पोपट पदमोर, अधिकार रतन थोरात, राजेंद्र हिरामण खताळ सर्व रा . हट्टी खू.ता . साक्री त्यातील संशयित आरोपी रोहिदास शिवाजी मासुळे रा . . हट्टी खू.ता. साक्री हा फरार झाला आहे . त्यांच्या ताब्यात एक एअर गन , एक लोखंडी तलवार आठ वेगवेगळ्या साईजचे लोखंडी पहाने , एक मोठे लोखंडी कटर त्याला धारदार पाते , दोन लहान कटर , हेक्झा ब्लेड / करवत पट्टी , एक किलो मिरची पावडर असे साहित्य मिळुन आल्याने ते जप्त करून त्यांना साहित्यासह पोलीस स्टेशनला आणुन त्यांच्याविरुध्द पोकॉ गणेश भबुतरा सोलंकी यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवी कलम ३९९ , ४०२ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ दाखल करण्यात आला आहे . यातील संशयित आरोपीतांवर नंदुरबार तसेच धुळे जिल्ह्यातील निजामपुर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत .सदरच्या कारवाईमुळे नंदुरबार जिल्ह्यातील सुझलॉन टॉवरवर होणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे असे जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार , पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे , असई संजय मनोरे , पोहेकॉ ज्ञानेश्वर सामुद्रे , पोना ज्ञानेश्वर पाटील , पोना आनंद मोरे , पोना राजेंद्र धनगर , पोना विनायक सोनवणे , पोकॉ गणेश सोलंकी , चालक पो.ना . महेंद्र सोनवणे , पोकॉ दिपक मालचे , पोकॉ सचिन सैंदाणे अशांनी केली आहे .
सुझलॉन टॉवरवर दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असणाऱ्या हट्टी येथील चौघांना पोलिसांनी पकडले त्यातील रोहिदास शिवाजी मासुळे याच्याविरुद्ध नंदूरबार पोलीस ठाण्यात कलम 379,379, 399,402,379,399 तर निजामपूर पोलीस ठाण्यात 379,34,369, 34,379,34 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.तर दुसरा संशयीत अधिकार रतन थोरात याच्याविरूद्ध नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात कलम 379 निजामपूर पोलीस ठाण्यात 379,379,379 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.तर तिसरा संशयीत राजेंद्र हिरामण खताळ याच्या विरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात 379 चा गुन्हा दाखल आहे.