नंदुरबार l प्रतिनिधी
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत श्रीरामपुर ता. नंदुरबार येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने भेट देऊन ग्रामपंचायती अंतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामे व उपक्रमांची पाहणी केली.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड.सीमा वळवी व उपाध्यक्ष ॲड
राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू आहे . सन २०१९-२० अंतर्गत संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तालुकास्तरावर उकृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीची जिल्हास्तरीय समिती मार्फत तपासणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भेट दिली.या समितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) डॉ. वर्षा फडोळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प) राजेंद्र पाटील,जिल्हा आरोग्य अधिकारी गोविंद चौधरी ,समाजकल्याण अधिकारी देविदास नांदगावकर यांचा समावेश होता.
यावेळी समितीने ग्राम पंचायती मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या शुद्ध पाणी वॉटर फिल्टर प्लान , जिल्हयातील महिलासाठी पहिला प्रयोग सखी प्रेरणा भवन (डिग्निटी रूम) , सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प , जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी उभारण्यात आलेल्या हॅण्ड वॉश स्टेशन,शौचालय बांधकाम व वापर , वैयक्तिक गोबरगस व श्रमदानातून केलेल्या वृक्ष लागवड व इतर विकास कामांची पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले .
याप्रसंगी गटविकास अधिकारी महेश वळवी,जिल्हा कार्यक्रम समन्वयक सुनील पाटील, विस्तार अधिकारी एन. जी . पाटील समाजशास्रज्ञ कैलास कांजरेकर ,माजी सरपंच विमलबाई गांगुर्डे, उपसरपंच शांताराम गावीत, माजी सरपंच शत्रूघन गांगुर्डे , ग्रामसेविका रूपाली देवरे , फिनिशचे नीलेश जाधव राकेश गुरव अंगणवाडी सेविका, आशाताई, शिपाई, रोजगार सेवक, संगणक ऑपरेटर तसेच निगराणी सदस्य उपस्थित होते.