Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वृषाली खैरनार यांच्या ‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाचे प्रकाशन, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदान योजनेत निवड

team by team
February 13, 2022
in शैक्षणिक
0
वृषाली खैरनार यांच्या ‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाचे प्रकाशन, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदान योजनेत निवड

नंदूरबार l प्रतिनिधी
विटाई (साक्री) येथील सौ.वृषाली नरेंद्र खैरनार यांच्या ‘दुष्टचक्र’ कथासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत निवड झालेला ‘दुष्टचक्र’ हा कथासंग्रह अमरावती येथील पायगुण प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात कृतिशील अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वैशाली पाटील ऊर्फ वृषाली खैरनार यांनी वंचित, शोषित यांच्या विषयी जाणवणारी सहवेदना या संग्रहातील कथांमधून प्रकट केली आहे.
डॉ.सतीश बडवे यांनी कथासंग्रहाची पाठराखण करताना ‘अंगणवाडीचे विश्व आणि पिचलेल्या स्त्रियांची घुसमट यामुळे वृषालीची कथा स्वतःची वेगळी वाट शोधणारी ठरते.’ असे म्हटले आहे. या संग्रहातील बहुतांश कथा धुळे व जळगाव आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झालेल्या आहेत.
महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव कुंदन मॅडम व एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आलेल्या असतांना कथासंग्रहाचे विशेष कौतुक केले. अंगणवाडी कार्यक्षेत्र व ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांना अधोरेखित करणा-या या कथासंग्रहा बद्दल वृषाली खैरनार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. चि.संकेत खैरनार याने संग्रहाच्या आशयाला बोलके करणारे मुखपृष्ठ तयार केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आयुष्य जगतांना भजन व भागवत यांच्या सानिध्यात जगा :प्रभू प्रियाजी

Next Post

तलावडी येथे हातपंपाचे जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post
तलावडी येथे हातपंपाचे जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

तलावडी येथे हातपंपाचे जि.प. अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add