म्हसावद l प्रतिनिधी
शरीर हे भाड्याचे घर आहे. या घराचा मालक हा परमेश्वर आहे . हे भाड्याच घर केव्हा खाली होईल हे सांगता येत नाही . आयुष्य हा एक बुडबुडा आहे त्यामुळे आयुष्य जगतांना भजन व भागवत याचा सानिध्यात जगा असे प्रतिपादन बाल विदुषी रामायनी प्रभू प्रियाजी यांनी लोंढरे येथील भागवत सप्ताहात केले.
तालुक्यातील लोंढरे येथे श्री.संत श्री वैकुंठ वासी मंगलनाथजी महाराज यांचा 24 व्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम भागवत कथा आयोजित करण्यात आली आहे . दरवर्षी मंगलनाथ महाराजांचा पुण्यतिथी निमित्त भागवत कथेचे आयोजन करण्यात येते . भागवत कथेचे हे 24 वे वर्ष आहे . पुढे बोलताना प्रभू प्रियाजी म्हणाल्या की जीवन हे फक्त दोन दिवसाच आहे पहिला दिवस म्हणजे जेव्हा आपला जन्म होतो तो व दुसरा दिवस म्हणजे आपला मृत्यूचा दिवस आहे . मधले दिवस म्हणजे आपल्या ला मिळालेला उपहार आहे त्याच प्रत्येकाने सोन केलं पाहिजे . कोणी 20 , 30 45 50 60 तर कोणी 100 वर्ष जीवन जगतो . तो किती वर्षे जीवन जगाला याला महत्व नाही तर तो कसा जीवन जगला. समाज उपयोगी काय काम केली समाजाचा तो कीती कामी पडला हे महत्वाचे आहे .
भजन आणि भागवतामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य बदलले . लोक परामार्थास लागले म्हणून आयुष्यात आल्यावर भागवत कथा करणे ऐकणे गरजेचे आहे . आयुष्य बिघडवताना शरीराचे दोन अंग कारणीभूत आहेत. एक म्हणजे डोळा जो खराब पाहण्याचा आदी आहे . जो खराब पाहण्यास प्राधान्य देतो व दुसरा अवयव म्हणजे कान आहे जो चुकीच ऐकतो ज्याने घरसंसार उध्वस्त होतात . त्यामुळे डोळे व कांन याचा योग्य वापर केला पाहिजे . भागवत कथा सुरू असताना भाविक मंत्र मुग्ध पद्धतीने ऐकत होते त्या सोबतच सुरू असलेल्या भजनात तल्लीन होत होते व भजनाचा मनमुराद आनंद घेत होते.
भागवत कथा 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली असून भागवत कथेचा वेळ रात्री 9 ते 12 असा आहे या कथेत कृष्ण जन्म लग्न सोहळा अश्या विविध झाकी प्रस्तुत करण्यात येत आहेत . कार्यक्रमाचे यजमान आनंदा रामदास निझरे , राजाराम रामदास निझरे हे असून आयोजन निझरे परिवार व समस्त लोंढरे ग्रामस्थ यांनी केले आहे . कार्यक्रमास लोंढरे गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत








