नवापुर l प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील नवापाडा ( धनराट ) येथील नवापाडा क्रिकेट टीम यांच्या वतीने व युवानेते धनंजय भरत गावित व पंचायत समिती सदस्य अमरसिंग ( सुमनशेठ ) गावित यांच्या सौजन्याने सुमाणिक ग्रामिण क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले आहे.
या क्रिकेट टुर्नामेंटचे धनंजय भरत गावित व अमरसिंग गावित यांच्या हस्ते नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आले. नवापुर तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांना खेळाविषयी आवड निर्माण व्हावी व आपल्या ग्रामीण भागातून उत्कृष्ट खेळाडू निर्माण होऊन आपल्या नवापुर तालुक्याचे नावलौकिक व्हावे या उद्देशाने धनंजय गावित हे नवापुर तालुक्यात असे टुर्नामेंटचे आयोजन करत असतात नवापुर तालुक्यातील नवापाडा ( धनराट ) येथे सुमाणिक ग्रामीण क्रिकेट टुर्नामेंटचे शुभारंभ करण्यात आले. या कार्यक्रमास धनराट ग्रा.पं. सरपंच दिनकर गावित, धनराट ग्रा.पं. उपसरपंच वारेश गावित, धनराट ग्रा.पं सदस्य केवजी गावित, सदस्या हेमलीताई गावित, सामाजिक कार्यकर्ते संदीप गावित, आयोजक योहान गावित, प्रकाश गावित, रमण गावित, आकाश गावित,श्री.लुकेश , अविनाश गावित, हंसराज गावित, हरिष गावित, सुनिल गावित,हारून गावित आदींसह युवा वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. नवापाडा क्रिकेट टीम यांनी आभार व्यक्त केले.








