तळोदा l प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व अक्कलकुवा तळोदाचे माजी आमदार डॉ. नरेंद्र पाडवी यांनी शेवटचा श्वास घेतल्याने सर्व समावेशक सामाजिक जाण असलेल्या एका वृत्ती जणू अंत झाल्याने त्यांच्या आत्म्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी परिसरातील सर्व पक्षीय राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
श्रद्धांजलीच्या या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद शिक्षण मंडळ अक्कलकुवा आणि मोलगी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद मोलगी परिसर सेवा समितीचे कार्यकर्ते,आपसिंग वसावे, विनायक साळवे महाराष्ट्र राज्य अनिसचे सरचिटणीस, एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ कंजाला संस्थेचे अध्यक्ष रामसिंग वळवी, भाजपा नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष अशोक राऊत,जि.प.सदस्य सी.के पाडवी,ब्रिजलाल पाडवी (बार्टी पुणे) समतादूत तथा सामाजिक कार्यकर्ता, बीजरीगव्हण सरपंच रोशन पाडवी,धनसिंग वसावे,दिलीप वसावे,वाण्या दादा,रायसिंग वसावे,रामसिंग राऊत,गोरख वानखेडे,अशोक वसावे,सुरुपसिंग वसावे, ॲड. फुलसिंग वळवी,पांडुरंग वळवी,अमृत वसावे,बहादूरसिंग पाडवी, देवजी वसावे,ॲड. राज्या पाडवी,रुषाताई वळवी,सुमित्रा वसावे,शीतल वसावे,आदी उपस्थित होते.
परिसरातील सर्व पक्षीय राजकीय,व सामाजिक कार्यकर्त्यांनी कै.माजी आमदार डॉ. नरेंद्र पाडवी श्रद्धांजली वाहिली व त्यांचे विचार आणि कार्य आपल्या जीवनातील कार्यात अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा विचार त्यांनी मांडला.








